"मैत्रीत आभार मानत नसतात, पण..." वैशाली सामंतची केदार शिंदेंसाठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:35 IST2025-12-24T12:34:27+5:302025-12-24T12:35:41+5:30

वैशाली सामंतने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत केदार शिंदेंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Vaishali Samant Emotional Post For Kedar Shinde | "मैत्रीत आभार मानत नसतात, पण..." वैशाली सामंतची केदार शिंदेंसाठी पोस्ट

"मैत्रीत आभार मानत नसतात, पण..." वैशाली सामंतची केदार शिंदेंसाठी पोस्ट

Vaishali Samant Emotional Post For Kedar Shinde : मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार, म्हणजेच सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे. या दोघांनधील मैत्री सर्वश्रुत आहे. गेल्या दोन दशकांपासून या जोडीने प्रेक्षकांना अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. नुकतीच वैशाली सामंतने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत केदार शिंदेंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

वैशालीने आपल्या पोस्टमध्ये केदार शिंदे यांच्या संगीतातील सखोल ज्ञानाचे आणि त्यांच्या सांगीतिक दृष्टीचे विशेष कौतुक केले आहे. ती म्हणाली, "प्रिय केदार... आज ही पोस्ट खास तुझ्यासाठी.आपल्या सांगीतीक मैत्रीसाठी. तुझ्या प्रत्येक चित्रपटाचा किंवा मालिकेचा महत्त्वाचा आणी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्यातलं संगीत. तुझ्या कल्पनेतील गाण्याकडे तू संगीतकारला गीतकारला आणी मग गायकला कसा हात धरून नेतोस. आणी अंतिम आउटपुट सामोरं आल्यावर कळतं याला काय म्हणायचं होत".

वैशालीने गेल्या २० वर्षांत केदार शिंदेंच्या अनेक प्रोजेक्ट्ससाठी गाणी गायली आहेत. तिने 'चमचम', 'कोंबडी', 'आभास हा', 'वी आर हनीमूनर्स', 'श्रीमंत दामोदर पंत', 'खो-खो' आणि 'गलगले' अशा सुपरहिट गाण्यांचा उल्लेख करत हा प्रवास किती जिव्हाळ्याचा होता, हे सांगितले.

२०२५ हे वर्ष संपत असतानाही ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 'अग अग सून बाई' हे त्यांचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. याबद्दल आनंद व्यक्त करताना वैशालीने म्हटले, "माझ्या सांगीतिक वाटचालीत तुझा महत्त्वाचा वाटा आहे. गायिका आणि संगीतकार म्हणून तू जो विश्वास ठेवला आहेस, त्याबद्दल काय बोलू? आभार शब्द मैत्रीत नसतो, पण तरीही तुझे आभार. आपलं हे सांगीतिक नातं असच पुढे जाओ हे स्वामींचरणी प्रार्थना".

वैशालीच्या या पोस्टने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. तिने लिहिले आहे की, "नवीन वर्षी तू प्रेक्षकांना एक 'सरप्राईज' देणार आहेस, त्याबद्दल मला उत्सुकता आहे". आता हे सरप्राईज केदार शिंदे यांचा नवा चित्रपट आहे की एखादा मोठा प्रोजेक्ट, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


Web Title : वैशाली सामंत ने केदार शिंदे को संगीत यात्रा के लिए धन्यवाद दिया।

Web Summary : वैशाली सामंत ने केदार शिंदे को दो दशकों से उनके संगीत मार्गदर्शन के लिए धन्यवाद देते हुए एक भावनात्मक नोट लिखा, जिसमें उनके सफल सहयोग पर प्रकाश डाला गया। उन्हें उनकी आगामी सरप्राइज परियोजना का इंतजार है।

Web Title : Vaishali Samant expresses gratitude to Kedar Shinde for musical journey.

Web Summary : Vaishali Samant pens emotional note thanking Kedar Shinde for his musical guidance over two decades, highlighting their successful collaborations. She anticipates his upcoming surprise project.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.