'फसक्लास दाभाडे' चित्रपट कसा वाटला? वैदेही परशुरामीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:16 IST2025-01-24T15:16:23+5:302025-01-24T15:16:33+5:30

वैदेही परशुरामीने नुकतंच 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावली. यानंतर तिने हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे.

Vaidehi Parshurami Review Fussclass Dabhade Movie Hemant Dhome Siddharth Chandekar Kshiti Jog Amey Wagh | 'फसक्लास दाभाडे' चित्रपट कसा वाटला? वैदेही परशुरामीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

'फसक्लास दाभाडे' चित्रपट कसा वाटला? वैदेही परशुरामीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

Vaidehi Parshurami on Fussclass Dabhade Movie: नववर्षाची सुरुवात झाल्यानंतर अर्थातच नवनवीन मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'फसक्लास दाभाडे' (Fussclass Dabhade Movie) हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.  तगडी स्टार कास्ट असलेला हा चित्रपट आणि त्यातील गाणी चांगलीच हिट होताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. 'फसक्लास दाभाडे'  या चित्रपटाबद्दल अभिनेत्री वैदेही परशुरामीने प्रतिक्रिया दिली आहे.

'फसक्लास दाभाडे'चा काल २३ जानेवरी रोजी प्रीमियर शो मुंबईत पार पडला. यावेळी कलाकारांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी चित्रपट पाहायला हजेरी लावली होती.  वैदेही परशुरामीने सिनेमा पाहिल्यानंतर खास पोस्ट शेअर केली. तिला सिनेमा कसा वाटला, याबद्दलचं मत तिनं पोस्टमध्ये माडलं आहे. 

इन्स्टाग्रामवर 'फसक्लास दाभाडे' सिनेमाच्या टीमसोबतचा फोटो शेअर करत तिनं लिहलं, "फसक्लास चित्रपटासाठी या फसक्लास कुटुंबाला फसक्लास शुभेच्छा!  खूप दिवसांनी एक परिपूर्ण कौटुंबिक चित्रपट बघितल्याचं समाधान मिळालं! प्रत्येकाने आपआपलं काम फसक्लासच्या पलिकडे भारी केलंय…खूप खूप अभिनंदन! आजपासून प्रदर्शित होणारा चित्रपट "फसक्लास दाभाडे" चित्रपटगृहात जाउनच बघा!".


हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात हसतं-खेळतं कुटुंब दिसत असून भावंडांमधील भांडणे आणि त्यांच्यातील घट्ट बॉण्डिंगही दिसत आहे.  दाभाडेंच्या घरातील या तीन खांबांना भेटणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरतेय.

Web Title: Vaidehi Parshurami Review Fussclass Dabhade Movie Hemant Dhome Siddharth Chandekar Kshiti Jog Amey Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.