अपघातानंतर सावरतेय उर्मिला कोठारे, शेअर केला लेक जीजासोबतचा गोड Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:30 IST2025-01-27T11:29:22+5:302025-01-27T11:30:57+5:30
उर्मिलानं लेक जीजासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे

अपघातानंतर सावरतेय उर्मिला कोठारे, शेअर केला लेक जीजासोबतचा गोड Video
उर्मिला कोठारे (Urmila Kothare) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. उर्मिलाचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. मुंबईतील कांदिवलीमधील पोईसर या मेट्रो स्टेशनजवळ उर्मिलाच्या गाडीची मेट्रो स्टेशनवर काम करणाऱ्या मजुरांना धडक बसली. यात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाले, तर एका मजूराचा मृत्यू झाला. या अपघाताचा भीषण धक्का अभिनेत्रीला बसला होता. पण, ती हळूहळू सावरत आहे. अशातच उर्मिलानं लेक जीजासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
उर्मिला ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठी अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत राहते. काल प्रजासत्ताक दिनानिमित्त उर्मिलानं खास व्हिडीओ शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओमध्ये उर्मिला आणि तिची लेक जीजा "ऐ वतन मेरे वतन" हे गाणं गाताना दिसतं आहे. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "या प्रजासत्ताक दिनी आपल्या भारतमातेला आदरांजली वाहताना माझ्या छोट्या देशभक्ताची तिच्या आवडत्या देशभक्तीपर गाण्यांचा सराव करतानाची एक झलक". उर्मिलाच्या लेकीचा हा गोड व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
जीजा ही उर्मिला आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांची मुलगी आहे. ती मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय स्टार किड आहे. उर्मिलानं महेश कोठारेंचा लेक आदिनाथबरोबर तिने २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती. अनेकदा उर्मिला आणि आदिनाथ हे लेकीबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. त्याच्या पोस्टला चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते. आदिनाथ आणि उर्मिला यांचं लव्ह मॅरेज आहे. पुण्यातल्या एका कॅफेत पहिली भेट झाली होती. त्यानंतर काही वर्ष त्यांनी एकमेंकाना डेट केलं होतं.