Video: सोनालीचा ‘गरमा गरम’ परफॉर्मन्स; पुणे मेट्रोमध्ये अप्सरेची धूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:52 IST2022-07-13T14:51:54+5:302022-07-13T14:52:21+5:30
Tamash Live:' तमाशा लाईव्ह' या चित्रपटातील ‘छंद लागला’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान गाजलं. या गाण्याच्या यशानंतर चित्रपटातील गरमा गरम हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.

Video: सोनालीचा ‘गरमा गरम’ परफॉर्मन्स; पुणे मेट्रोमध्ये अप्सरेची धूम
मराठी कलाविश्वातील अप्सरा या खास नावाने ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni). गेल्या वर्षभरापासून सोनालीचे लागोपाठ असंख्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. झिम्मा, पांडू या चित्रपटांच़्या यशानंतर आता तिचा तमाशा लाईव्ह हा आगामी चित्रपट येऊ घातला आहे. सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरु असून यातील प्रत्येक गाणं सुपरहिट होताना दिसत आहे. यामध्येच तिचं आणखी एक नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.
'तमाशा लाईव्ह' (Tamash Live) या चित्रपटातील ‘छंद लागला’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान गाजलं. या गाण्याच्या यशानंतर चित्रपटातील गरमा गरम हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे हे गाणं हटके पद्धतीने प्रदर्शित करण्यात आलं. पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर हे गाणं प्रदर्शित झालं.
पुण्यातील गरवारे मेट्रो स्थानकात अनेक प्रवाशांच्या, चाहत्यांच्या उपस्थितीत गरमा गरम हे प्रदर्शित करण्यात आले. या वेळी सोनाली कुलकर्णीने तिच्या बहारदार डान्समुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. गरमा गरम या गाण्याला वैशाली सामंत यांचा स्वरसाज लाभला आहे.
संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील गाण्यांना श्रोते भरभरून प्रतिसाद देत आहेत. ‘छंद लागला’ या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून या गाण्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रील्स बनवण्याचा छंद लावला आहे. त्यातच आता या ‘गरमा गरम’ गाण्यावर नृत्य करण्याचा मोहही प्रेक्षकांना आवरता आला नाही. तेही या वेळी ‘तमाशा लाईव्ह’च्या टीमसोबत थिरकले. येत्या १५ जुलैपासून ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे