Shreyas Talpade : गोष्ट एका...एकाच शर्टची..., श्रेयस तळपदेनं सांगितली एक अफलातून गंमत..., पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 03:54 PM2022-11-25T15:54:23+5:302022-11-25T15:54:39+5:30

Shreyas Talpade : श्रेयसने इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रेयस एका शर्टची गोष्ट सांगतोय...

The story of one and only shirt..., Shreyas Talpade told an throwback story | Shreyas Talpade : गोष्ट एका...एकाच शर्टची..., श्रेयस तळपदेनं सांगितली एक अफलातून गंमत..., पाहा व्हिडीओ

Shreyas Talpade : गोष्ट एका...एकाच शर्टची..., श्रेयस तळपदेनं सांगितली एक अफलातून गंमत..., पाहा व्हिडीओ

googlenewsNext

अभिनेता श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade) मराठीसह हिंदीमध्ये देखील अभिनयाचा ठसा उमठवला आहे. श्रेयस सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत यशची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. सर्वांचा लाडका श्रेयस सोशल मीडियावरही कमालीचा अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर त्याने नुकताच 1 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियावर अनेक किस्से, आठवणी तो शेअर करत असतो. सध्या त्याने एक भन्नाट आठवण शेअर केलीये. होय, ‘एकाच’ शर्टची अफलातून गंमत त्याने सांगितली आहे.

काय आहे की ही गोष्ट, एका.. एकाच शर्टची...
तर श्रेयसने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रेयस एकाच शर्टची गोष्ट सांगतोय. व्हिडीओच्या सुरूवातीला ‘पछाडलेला’ या सिनेमाचा सीन दिसतो. या सीनमध्ये श्रेयसने एक लांब रेघांचं शर्ट घातलेलं दिसतेय. 

तो म्हणतो, हा सीन आहे, 2004 साली रिलीज झालेल्या ‘पछाडलेला’ या सिनेमातील. महेश कोठारे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्यांनीच 1980 मध्ये आणखी एक सुपरहिट सिनेमा दिग्दर्शित केला होता ‘धूमधडाका’ नावाचा. ही पोस्ट टाकण्यामागचं कारण हे आहे की, हा जो मी शर्ट घातलाये, तोच अगदी तोच शर्ट अशोक सराफ सराफ सरांनी सुद्धा ‘धूमधडाका’मध्ये घातला होता. पुराव्यादाखल श्रेयसने ‘धुमधडाका’ सिनेमाची क्लिपही शेअर केली आहे. यात अशोक सराफ त्याच शर्टमध्ये दिसत आहेत.

महेश कोठारे सरांनी हा शर्ट अजूनही जपून ठेवला असेल, अशी मला खात्री आहे. कारण ते केवळ वस्तूच नाही तर नाती सुद्धा तितक्याच प्रेमाने जपतात..., असंही श्रेयसने म्हटलं आहे. शिवाय संधी दिल्याबद्दल महेश कोठारे यांचे आभारही मानले आहेत.

Web Title: The story of one and only shirt..., Shreyas Talpade told an throwback story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.