'फसक्लास दाभाडे'मधील रोमँटिक गाणं 'मनाला लायटिंग' प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:17 IST2025-01-13T18:15:58+5:302025-01-13T18:17:08+5:30

Fassclass Dabhade Movie :'फसक्लास दाभाडे'मधील नवीन रोमँटिक गाणं 'मनाला लायटिंग' हे नुकतंच प्रदर्शित झालं आहे. लग्नानंतरच्या प्रेमळ क्षणांवर आधारित असलेल्या या गाण्यात सोनू आणि कोमलच्या अरेंजवाल्या लव्हस्टोरीचा गोडवा, त्यांच्या नव्या नात्यातील जवळीक पाहायला मिळत आहे.

The romantic song 'Manala Lighting' from 'Fassclass Dabhade' is ready to be released to the audience | 'फसक्लास दाभाडे'मधील रोमँटिक गाणं 'मनाला लायटिंग' प्रेक्षकांच्या भेटीला

'फसक्लास दाभाडे'मधील रोमँटिक गाणं 'मनाला लायटिंग' प्रेक्षकांच्या भेटीला

बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 'फसक्लास दाभाडे'(Fassclass Dabhade Movie)मधील नवीन रोमँटिक गाणं 'मनाला लायटिंग' हे नुकतंच प्रदर्शित झालं आहे. लग्नानंतरच्या प्रेमळ क्षणांवर आधारित असलेल्या या गाण्यात सोनू आणि कोमलच्या अरेंजवाल्या लव्हस्टोरीचा गोडवा, त्यांच्या नव्या नात्यातील जवळीक पाहायला मिळत आहे. शिवाय तायडी आणि दाजींचं लग्नानंतरचं प्रेम आणि पप्पूचं हरवलेलं प्रेमसुद्धा बघायला मिळतंय. 

अमेय वाघ-राजसी भावे, क्षिती जोग- हरीष दुधाडे, सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर या जोडप्यांचा गोड अंदाज या गाण्यात दिसतोय. अमितराज यांच्या संगीताने आणि क्षितिज पटवर्धन यांच्या शब्दांनी या गाण्याला एक वेगळाच श्रृंगारीक साज चढवला आहे. तर अमितराज यांच्याच आवाजातून व्यक्त झालेला प्रेमभाव संगीतप्रेमींना भावणारा आहे. 


दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''अरेंज मॅरेजनंतरचे काही दिवस एकमेकांना समजून घेण्यात जातात. एकमेकांच्या सहवासात घालवलेला तो प्रत्येक क्षण खूप गोड असतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रोमान्स दडलेला असतो. प्रेम हळुवार खुलत असते. एकदंरच हे सोनेरी क्षण दाखवण्याचा प्रयत्न आम्ही याच केला आहे. लग्नं झालेल्या, होऊ घातलेल्या किंवा तशी स्वप्नं बघणाऱ्या प्रत्येकाला हे गाणं आपलंसं करून टाकणार याची मला खात्री आहे.''

'फसक्लास दाभाडे' या दिवशी येणार भेटीला

हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' येत्या २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित 'फसक्लास दाभाडे'चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओज करत आहे.

Web Title: The romantic song 'Manala Lighting' from 'Fassclass Dabhade' is ready to be released to the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.