RaanBaazaar Teaser : तेजस्विनी पंडित व प्राजक्ता माळीची आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड सीरिज; पाहा, ‘रानबाजार’चा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 14:09 IST2022-05-15T14:37:47+5:302022-05-19T14:09:52+5:30

Marathi Web Series RaanBaazaar Teaser Out : वेबविश्वाला हादरवून टाकणारा... मराठीतला आजपर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर..., तुम्ही पाहिलात का?

Tejaswini Pandit prajakta mali new marathi series raanbaazaar teaser | RaanBaazaar Teaser : तेजस्विनी पंडित व प्राजक्ता माळीची आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड सीरिज; पाहा, ‘रानबाजार’चा टीझर

RaanBaazaar Teaser : तेजस्विनी पंडित व प्राजक्ता माळीची आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड सीरिज; पाहा, ‘रानबाजार’चा टीझर

 RaanBaazaar Teaser Out : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ( Tejaswini Pandit ) हिची एक नवी वेबसरिज प्लॅनेट मराठीवर येतेय. काही क्षणांआधी तेजस्विनीनं  ‘रानबाजार’ (RaanBaazaar) या सीरिजचा पहिला टीझर शेअर केला आणि सगळेच थक्क झालेत. तेजस्विनी यात एका बोल्ड भूमिकेत दिसतेय. तिचा आगळावेगळा अंदाज यात पाहायला मिळतो.
टीझरच्या बॅकग्राऊंडमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या माहिलेचा आवाज ऐकू येतो आणि याचदरम्यान तेजस्विनीची एन्ट्री होते. सिगरेट ओढताना आणि पाठोपाठ कपडे उतरवताना ती दिसते.

‘एकदा लोकांची सेवा करून पाहिली... एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला... एकदा बदलाही घेतला... आता मात्र फसत चाललीय... सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी...,’ असं तिने हा टीझर शेअर करताना लिहिलं आहे. वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’, ट्रेलर येतोय 18 मे ला, असंही तिने लिहिलं आहे.

प्राजक्ता माळीचाही बोल्ड लुक...

या सीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही सुद्धा बोल्ड लुकमध्ये दिसणार आहे. तिनेही ‘रानबाजार’चा दुसरा टीझर शेअर केला आहे. ‘प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न....,’ असं कॅप्शन तिने हा टीझर शेअर करताना दिलं आहे.
  रेगे, ठाकरे असे सिनेमे बनवणरारे आणि ज्वलंत विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी ही सीरिज दिग्दर्शित केली आहे. 20 मे पासून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

'त्या' दोघींमुळे राजकारणात आणलेल्या वादळाची रंजक गोष्ट!

'रानबाजार'... नवी कोरी वेबसीरीज पाहा फक्त प्लॅनेट मराठीवर. अ‍ॅप इन्स्टॉल करा आत्ताच!

अँड्रॉईड युजर्ससाठी >> https://bit.ly/3wCnSPx

आयफोन युजर्ससाठी >> https://apple.co/39Z5cBS

  

Web Title: Tejaswini Pandit prajakta mali new marathi series raanbaazaar teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.