RaanBaazaar Trailer : दोन फुलपाखरं फडफडली आणि...! पाहा, तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळीच्या ‘रानबाजार’चा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 14:09 IST2022-05-18T17:08:46+5:302022-05-19T14:09:07+5:30
RaanBaazaar Official Trailer : वादळ येणार, वणवा पेटणार... तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळीचा वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’

RaanBaazaar Trailer : दोन फुलपाखरं फडफडली आणि...! पाहा, तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळीच्या ‘रानबाजार’चा ट्रेलर
RaanBaazaar Official Trailer तेजस्विनी पंडित (Tejasswini Pandit ) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) या दोघींच्या ‘रानबाजार’ (RaanBaazaar ) या आगामी वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. कारणही तसंच आहे. तेजस्विनी व प्राजक्ता दोघीही या सीरिजमध्ये बोल्ड भूमिका साकारताना दिसत आहेत. मराठी वेबविश्वाला हादरवून सोडणाऱ्या या सीरिजचे दोन टीझर तुम्ही पाहिलेच. या टीझरनंतर अनेकांनी प्राजक्ता व तेजस्विनीला ट्रोलही केलं. आता या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलरही तितकाच बोल्ड आहे.
दोन छोट्या फुलपाखरांनी गरजेपेक्षा जास्त पंख फडफडवले, त्यांच्या कंपन्याने मोठ्ठं वादळ तयार झालं...अशा एका डायलॉगने ट्रेलरची सुरूवात होते. सुरूवातीला दिसतो तो तेजस्वीचा बोल्ड लुक. पाठोपाठ प्राजक्ता माळीची एन्ट्री होते.
मोहन आगाशे, उर्मिला कोठारे, आनंद जोग, वनिता खरात, मोहन जोशी, अभिजीत पानसे, सुरेखा कुडची, वैभव मांगले, सचिन खेडेकर आणि अनेक दिग्गज कलाकारांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ट्रेलर बघता, ही केवळ एक बोल्ड कथा नाही तर या सीरिजमध्ये राजकीय थरार पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होतं. ट्रेलरमधील संवाद जबरदस्त आहेत. कलाकारांचा अभिनयही तितकाच जबरदस्त आहे.
सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पहिल्या 57 मिनिटांत 15,363 लोकांनी हा ट्रेलर पाहिला. रेगे, ठाकरे असे सिनेमे बनवणरारे आणि ज्वलंत विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी ही सीरिज दिग्दर्शित केली आहे. 20 मे पासून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
'त्या' दोघींमुळे राजकारणात आणलेल्या वादळाची रंजक गोष्ट!
'रानबाजार'... नवी कोरी वेबसीरीज पाहा फक्त प्लॅनेट मराठीवर. अॅप इन्स्टॉल करा आत्ताच!
अँड्रॉईड युजर्ससाठी >> https://bit.ly/3wCnSPx
आयफोन युजर्ससाठी >> https://apple.co/39Z5cBS