"हे नाही पाहिलं तर मग काय पाहिलं?", 'एप्रिल मे ९९' पाहिल्यानंतर भारावून गेली तेजश्री प्रधान, शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 16:01 IST2025-05-23T16:01:22+5:302025-05-23T16:01:55+5:30
अनेक सेलिब्रिटीही 'एप्रिल मे ९९' सिनेमाबाबत पोस्ट करत आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेदेखील 'एप्रिल मे ९९' सिनेमाबाबत इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केली असून हा सिनेमा पाहण्याचा आवाहन चाहत्यांना केलं आहे.

"हे नाही पाहिलं तर मग काय पाहिलं?", 'एप्रिल मे ९९' पाहिल्यानंतर भारावून गेली तेजश्री प्रधान, शेअर केली पोस्ट
सध्या 'एप्रिल मे ९९' या मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सिनेमा रिलीज होण्याआधीच सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली होती. अनेक सेलिब्रिटीही 'एप्रिल मे ९९' सिनेमाबाबत पोस्ट करत आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेदेखील 'एप्रिल मे ९९' सिनेमाबाबत इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केली असून हा सिनेमा पाहण्याचा आवाहन चाहत्यांना केलं आहे.
तेजश्रीने 'एप्रिल मे ९९' सिनेमाचं पोस्टर इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलं आहे. "सुट्टीमध्ये हे नाही पाहिलं तर मग काय पाहिलं? चला तिकिटे काढा पटकन...बालपणीच्या आठवणींची सहल तेदेखील माझे फेव्हरेट मापुसकर ब्रदर्स यांच्यासोबत", असं तेजश्रीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. या स्टोरीमध्ये तिने दिग्दर्शक रोहन मापुसकर यांनाही टॅग केलं आहे.
'एप्रिल मे ९९' सिनेमातून कृष्णा, सिद्धेश, प्रसाद आणि जाई यांच्या मैत्रीची धमाल गोष्ट पाहायला मिळणार आहे. या सिनेमात आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर, साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रोहन मापूसकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आजपासून हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.