सुशीला-सुजीत आत, फोन बाहेर, बेडरुमचा दरवाजा बंद होतो अन्...; सोनाली कुलकर्णी-स्वप्नीलच्या सिनेमाचा मजेशीर ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:32 IST2025-04-02T13:31:46+5:302025-04-02T13:32:06+5:30

'सुशीला सुजीत' या आगामी मराठी सिनेमाचा खास ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वेगळा विषय असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर अनेकांना आवडलेला दिसतोय (susheela sujeet)

susheela sujeet marathi movie trailer swapnil joshi amruta khanvilkar sonali kulkarni prasad oak | सुशीला-सुजीत आत, फोन बाहेर, बेडरुमचा दरवाजा बंद होतो अन्...; सोनाली कुलकर्णी-स्वप्नीलच्या सिनेमाचा मजेशीर ट्रेलर

सुशीला-सुजीत आत, फोन बाहेर, बेडरुमचा दरवाजा बंद होतो अन्...; सोनाली कुलकर्णी-स्वप्नीलच्या सिनेमाचा मजेशीर ट्रेलर

प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी (swapnil joshi) या त्रिकुटाच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा म्हणजे 'सुशीला सुजीत'. या सिनेमाची संपूर्ण टीम गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच 'सुशीला सुजीत' (susheela sujeet movie) सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये खास कथानक पाहायला मिळत असून कॉमेडीचा आगळावेगळा थरार ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे. काय आहे 'सुशीला सुजीत'च्या ट्रेलरमध्ये, जाणून घ्या.

'सुशीला सुजीत'चा ट्रेलर

आज मुंबईत 'सुशीला सुजीत'चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी सोशल मीडियावर सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलरमध्ये दिसतं की, सुशीला आणि सुजीत हे दोघेजण घरातील बेडरुममध्ये लॉक होतात. ते दार उघडायचा प्रयत्न करतात परंतु दरवाजा उघडला जात नाही. अशातच दोघांचे फोनही बेडरुमच्या बाहेर असतात. त्यामुळे दोघांवर भलताच प्रसंग ओढवतो. हे दोघे बेडरुममधून बाहेर कसे येणार? बेडरुममधून बाहेर येण्यासाठी ते कशी  अशा धमाल कहाणीची झलक सिनेमाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळतेय. ट्रेलरच्या शेवटी अमृता खानविलकरचीही झलक दिसते. 

'सुशीला सुजीत'कधी रिलीज होणार

'सुशीला सुजीत' सिनेमा १८ एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमात स्वप्नील आणि सोनालीसोबत सुनील तावडे, नम्रता संभेराव, रीलस्टार अथर्व सुदामे, रेणुका दफ्तरदार, राधा सागर, राजेंद्र शिसाटकर, अजय कांबळे हे कलाकार झळकणार आहेत. पंचशील एंटरटेनमेंट्स आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आगळंवेगळं कथानक असलेला हा सिनेमा थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडे दिवस वाट पाहावी लागेल.

Web Title: susheela sujeet marathi movie trailer swapnil joshi amruta khanvilkar sonali kulkarni prasad oak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.