"एकनाथ शिंदे यांच्यासाठी ग्रेट हा शब्दच कमी पडेल", सुशांत शेलार नेमकं काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:10 IST2025-01-06T14:10:14+5:302025-01-06T14:10:20+5:30
सुशांत शेलारनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.

"एकनाथ शिंदे यांच्यासाठी ग्रेट हा शब्दच कमी पडेल", सुशांत शेलार नेमकं काय म्हणाला?
अभिनय आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता सुशांत शेलार (Sushant Shelar) सध्या चर्चेत आलाय. सुशांत हा एकनाथ शिंदेंच्याशिवसेना गटाचा कार्यकर्ता आहे. शिवसेना सचिव आणि शिव चित्रपट सेना अध्यक्ष ही दोन पदं सध्या तो सांभाळत आहे. अशातच सुशांत शेलारनं राज्याचे उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदेंबद्दल (Eknath Shinde) केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
सुशांत शेलारनं "इट्स मज्जा"ला मुलाखत दिली. यावेळी राज्यात अनेक पक्ष आहेत, पण शिवसेना आणि एकनाथ शिंदे हेच का निवडलं? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शेलार म्हणाला, "मी लोअर परेळमध्ये जन्मला आलो, तेव्हापासून माझ्यासोबत धनुष्यबाण जोडला गेला. माझे आई-बाबाही पुर्वीपासून शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून काम करत राहिले. तेव्हा गिरणगावातील सर्व स्पर्धा, उत्सव हे शिवसेनेकडून आयोजित व्हायचे. २००९ मध्ये जेव्हा बाळासाहेबांचा आशिर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर गेलो, तेव्हा बाळासाहेबांच्या समक्ष माझी शिंदे यांच्यासोबत ओळख झाली. तो एक योग होता. त्याच्यासोबत जोडला गेलो. शिंदे यांच्यासोबत काम केलं म्हणजे देवासोबत काम केलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही".
पुढे ते म्हणाले, "एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना ग्रेट हा शब्दच कमी पडेल. कारण ते स्व:ताला ग्रेट समजत नाहीत. ते अजूनही स्व:ताला कार्यकर्ता समजतात. मी रात्री-अपरात्री त्यांना काम करताना पाहिलं आहे. त्यांना कधीही कंटाळा आलेलं पाहिलं नाही. माणसांना भेटायला त्यांना आवडतात, काम करायला आवडतं. रात्री-अपरात्री सामान्य माणसाच्या कामासाठी ते कुणालाही फोन करायला त्याची तयारी असते. शेतकरी, कलाकार आणि लहान मुले या सर्वांसाठी मी वर्षा बंगल्याची दार उघडी असल्याचं पाहिलं आहे. एकदा रात्री साडीतीन वाजता दुर्गम भागातून आलेल्या लोकांना शिंदे यांना भेटताना मी पाहिलं आहे. हे काहीतरी दैवी शक्ती आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राला अडीच वर्ष त्यांचा कार्यकाळ अनुभवायला मिळाला ही मोठी गोष्ट आहे".