सूरज चव्हाणची बॉक्स ऑफिसवर 'झापुक झुपूक' कामगिरी, पाचव्या दिवशी केली इतकी कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:13 IST2025-04-30T12:12:40+5:302025-04-30T12:13:11+5:30
Zapuk Zupuk Movie : केदार शिंदे दिग्दर्शित आणि बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता सूरज चव्हाणचा झापुक झुपूक सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

सूरज चव्हाणची बॉक्स ऑफिसवर 'झापुक झुपूक' कामगिरी, पाचव्या दिवशी केली इतकी कमाई
केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित आणि बिग बॉस मराठी सीझन पाचचा (Bigg Boss Marathi Season 5) विजेता सूरज चव्हाण(Suraj Chavan)चा 'झापुक झुपूक' सिनेमा (Zapuk Zupuk Movie) नुकताच प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून जगभरात या चित्रपटाने १.०९ कोटींची कमाई केल्याचे समजते आहे.
निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सूरजवर सिनेमा बनवणार असल्याचे जाहीर केले होते. शो संपल्यानंतर ६ महिन्यांच्या अवधीनंतर झापुक झुपूक हा सिनेमा २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटासाठी केदार शिंदेंनी सूरजवर प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहून अनेकांनी सूरजचं कौतुक केलं तर काहींनी त्याला ट्रोल केलं. आताही सिनेमा रिलीज झाल्यानंतरही केदार शिंदे आणि सूरजला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. मात्र सलग पाच दिवसात सूरजच्या झापुक झुपूक सिनेमाने १७ लाखांची कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिसवरील कमाई
झापुक झुपूक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी २४ लाखांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी १९ लाख आणि चौथ्या दिवशी १४ लाखांची कमाई केली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पाचव्या दिवशी सूरजच्या सिनेमाने १७ लाख कमविले आहेत. तर जगभरात झापुक झुपूक सिनेमाने १.०९ कोटींची कमाई केली आहे.
झापुक झुपूक सिनेमाबद्दल
झापुक झुपूक सिनेमा सूरज चव्हाण सोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंद फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट २५ एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला