"टीव्हीसारखी संधी सिनेमांमध्ये मिळाली नाही...", स्पृहा जोशीने व्यक्त केली खंत, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:27 IST2025-10-29T13:26:37+5:302025-10-29T13:27:25+5:30
मला आजपर्यंत कारण कळलेलं नाही..., स्पृहा असं का म्हणाली?

"टीव्हीसारखी संधी सिनेमांमध्ये मिळाली नाही...", स्पृहा जोशीने व्यक्त केली खंत, म्हणाली...
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय चेहरा गोड अभिनेत्री स्पृहा जोशी. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या स्पृहा 'पुरुष' या नाटकात काम करत आहे. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'उंच माझा झोका', 'लोकमान्य', 'सुख कळले' अशा मालिकांमध्ये तिची भूमिका गाजली. तसंच 'पुनश्च हरि ओम', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' असे काही सिनेमेही तिने केले. मात्र तिला सिनेमांमध्ये जास्त एक्सप्लोर करता आलं नाही. यावर नुकतंच तिने एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.
'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत स्पृहा जोशी म्हणाली, "मला सिनेमांबाबीत खूप वाटतं की ज्यासाठी मी योग्य आहे असे सिनेमे माझ्याकडे का येत नाहीत? असं का होतं मला कळलेलं नाही. कोणी दिग्दर्शक माझ्याकडे चांगली स्क्रिप्ट घेऊन आले तर मी तयारच आहे. मला वेगळ्या भूमिका करायला नक्कीच आवडतील. पुनश्च हरि ओम, विकी वेलिंगकर हे सिनेमे करताना मला मजा आली. पण जितकं एक्स्प्लोर मला टीव्हीमध्ये करता आलं किंवा नाटकांमध्ये करता आलं तितकी संधी मला चित्रपटांमध्ये मिळाली नाही. नाटकांबाबतीत तर मी खूप नशीबवान समजते की मला खूप वेगवेगळ्या पद्धतीची, वयाची भूमिका करायला मिळाली."
स्पृहाने हिंदीतही काम केलं आहे. 'रंगबाज'ही तिची सीरिज गाजली. गेल्या वर्षी 'रणनीती:बालाकोट अँड बियॉन्ड' ही सीरिज आली. स्पृहा कवयित्रीही आहे. तिच्या कवितांचे कार्यक्रमही हाऊसफुल असतात. संकर्षण कऱ्हाडेसोबत तिचा 'संकर्षण व्हाया स्पृहा' हा कवितांचा कार्यक्रम सध्या लोकप्रिय आहे.