सोनाली कुलकर्णीच्या लंडनमधील दुसऱ्या लग्नाचा थाटच न्यारा!, मराठी कलाविश्वात पहिल्यांदाच घडणार असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 09:27 IST2022-06-03T09:26:40+5:302022-06-03T09:27:04+5:30

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णी हिने ७ मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी लंडनमध्ये पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा लग्नगाठ बांधली.

Sonalee Kulkarni's second wedding video will be telecast on OTT, something that will happen for the first time in the Marathi art world ... | सोनाली कुलकर्णीच्या लंडनमधील दुसऱ्या लग्नाचा थाटच न्यारा!, मराठी कलाविश्वात पहिल्यांदाच घडणार असं काही...

सोनाली कुलकर्णीच्या लंडनमधील दुसऱ्या लग्नाचा थाटच न्यारा!, मराठी कलाविश्वात पहिल्यांदाच घडणार असं काही...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने ७ मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी लंडनमध्ये पती कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) सोबत पुन्हा लग्नगाठ बांधली. तिच्या या दुसऱ्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांमध्ये खूप होती. मात्र या लग्नाचे फोटो किंवा व्हिडीओ सोनालीने सोशल मीडियावर शेअर केले नाहीत. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, चक्क तिच्या लंडनमधील लग्नाचा व्हिडीओ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. हो, हे खरंय खुद्द सोनाली कुलकर्णीनेच हा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.

७ मे, २०२१ रोजी सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत गुपचूप लग्न केले होते. कोरोना महामारीमुळे तिला हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने तिथल्या मंदिरात जाऊन करावे लागले होते. त्यावेळी त्या दोघांच्या घरातल्यांनी ऑनलाइन लग्नाला उपस्थिती लावली होती. मात्र हे लग्न खऱ्या अर्थाने गेल्या महिन्यात लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी म्हणजेच ७ मे, २०२२ ला पार पडले. पुन्हा एकदा सोनाली आणि कुणालने लग्नगाठ बांधली तेदेखील कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत. हा विवाह सोहळा लंडनमध्ये पार पडला. मात्र या लग्नाचे फोटो किंवा व्हिडीओ अद्याप समोर आलेला नाही.

सोनालीने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझा सर्व विधींवर विश्वास आहे. सर्व विधींसोबत माझं लग्न व्हावे, अशी माझी इच्छा होती. जोपर्यंत ते विधी पार पडले नाहीत, तोपर्यंत मला लग्न केल्यासारखे वाटलेच नाही. याच मुलाखतीत सोनालीने तिच्या लग्नाचा व्हिडीओ लवकरच एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार असल्याचे सांगितले. ती म्हणाली की, मराठी कलाविश्वात असं अद्याप कोणीच केलेले नाही. त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे. 
लग्नानंतर सोनाली हनीमूनसाठी मॅक्सिकोला गेली होती. तिथले तिचे बिकनीतील हॉट आणि नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो खूप चर्चेत आले होते. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर ती तमाशा लाईव्ह या चित्रपटात लवकरच पाहायला मिळणार आहे.

Web Title: Sonalee Kulkarni's second wedding video will be telecast on OTT, something that will happen for the first time in the Marathi art world ...