सई ताम्हणकर आणि स्मृती मानधना यांना आवडते 'ही' खास एकच गोष्ट! तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:12 IST2025-11-06T13:12:04+5:302025-11-06T13:12:35+5:30
जाणून घ्या, सांगलीच्या या दोन स्टार्सना नेमकी कोणती एक गोष्ट आवडते?

सई ताम्हणकर आणि स्मृती मानधना यांना आवडते 'ही' खास एकच गोष्ट! तुम्हाला माहीत आहे का?
Smriti Mandhana-Sai Tamhankar Favourite: सांगलीच्या दोन लोकप्रिय स्टार्स म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार आणि सलामीची बॅटर स्मृती मानधना. या दोघींचा प्रवास पूर्णपणे वेगळा असला तरी, त्यांच्यात एक अत्यंत गोड आणि चमचमीत कनेक्शन समोर आलं आहे. अभिनय आणि क्रिकेटच्या जगातील या दोन टॉप कलाकारांची आवड हूबेहूब एकसारखी आहे. त्यांच्यातील हे खास 'सांगली कनेक्शन' नेटकऱ्यांनी नुकतेच शोधून काढले असून, ते खाद्यपदार्थाच्या एका आवडीशी जोडलेले आहे.
सई ताम्हणकर आणि स्मृती मानधना या दोघींना एकाच पदार्थाची प्रचंड आवड आहे, ज्यामुळे त्यांची चॉईस एकदम 'सेम टू सेम' ठरली आहे. ती गोष्ट आहे सांगलीतील प्रसिद्ध "संभा भेळ". 'सांगलीच्या या लेकीं'ना संभा भेळ प्रचंड आवडते. नुकतंच स्मृती मानधनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात ती तिच्या आवडत्या पदार्थांबद्दल बोलताना दिसली. स्मृती म्हणाली की, "मला गोड भेळ जास्त आवडते, मी तिखट भेळ खात नाही. सांगलीत एक स्पेशल भेळ मिळते, संभा भेळ. मी त्यांना नेहमी म्हणते की, शक्य झालं असतं तर प्रत्येक ठिकाणी मी तुमचा गाडा घेऊन गेले असते, मला ती भेळ इतकी आवडते".
स्मृतीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी लगेचच सई ताम्हणकरच्या जुन्या मुलाखती आठवल्या. सई ताम्हणकर हिने देखील तिच्या अनेक मुलाखतींमध्ये संभा भेळीवरचे तिचे अफाट प्रेम वारंवार व्यक्त केले आहे. क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घालणारी स्मृती असो वा अभिनय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केलेली सई असो या दोघीही 'संभा भेळी' च्या प्रेमात आहेत.
संभा भेळ ही सांगली येथील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्ट्रीट फूड भेळ आहे, जी आपल्या खास चवीसाठी ओळखली जाते आणि या ठिकाणाला जवळपास ५८ वर्षांचा इतिहास आहे. ही एक शाकाहारी भेळ असून, सांगलीतील महाराजा चौकात, वाखर भागात आणि १०-फूट रोडवरील व्हाईट हाऊसजवळ या भेळच्या गाड्या उपलब्ध आहेत. ही भेळ सांगलीची खासियत असून, तेथील खाद्यप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहे.