श्रीदेवी प्रसन्नमधील सईसोबतच्या किसिंग सीनवर सिद्धार्थची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "त्यानंतर आम्ही दोघं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 19:59 IST2024-01-16T19:55:47+5:302024-01-16T19:59:14+5:30
सई आणि सिद्धार्थची अरेंजवाली लव्हस्टोरी 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटातील सईसोबतच्या किसिंग सीनवर काय म्हणाला सिद्धार्थ चांदेकर?
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत असलेला 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सई-सिद्धार्थ ही फ्रेश जोडी या सिनेमाच्या निमित्ताने दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सिद्धार्थ आणि सई ''श्रीदेवी प्रसन्न'' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे.
नुकतंच सई आणि सिद्धार्थने लोकमत फिल्मीशी गप्पा मारल्या. यावेळी सिद्धार्थने सईसोबतच्या किसिंग सीनवर भाष्य केलं. तो म्हणाले, ' सिनेमात आमचा असा एक खूप रोमाँन्टिक किसिंग सीन आहे. मोठे-मोठे श्वास घेतल्यानंतर आम्ही तो किसिंग सीन दिला. तो सीन शुट होण्याआधी आणि नंतर आम्ही एकमेंकाशी बोललोच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉफीला भेटलो. तेव्हा चर्चा केली आणि त्यावर न बोलण्याचं ठरवलं. कारण हे खूप अवघड होतं'.
सई आणि सिद्धार्थची अरेंजवाली लव्हस्टोरी 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यात सिनेमातील मजेशीर संवादाची झलक पाहायला मिळत आहे. सई-सिद्धार्थमधले हलकेफुलके संवाद आणि त्यांची केमिस्ट्री याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रीदेवी प्रसन्न सिनेमाचा २.३९ मिनिटांच्या ट्रेलरमधून या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शीगेला पोहोचली आहे.
'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. तर विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा 2 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या लाडक्या जोडीसह हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता.