प्रतिक्षा लोणकर अन् श्रेयस तळपदेचा मजेशीर Video व्हायरल, चाहते म्हणतात, 'दामिनी मालिकेचं...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 13:44 IST2023-07-03T13:43:08+5:302023-07-03T13:44:57+5:30
इक्बाल आणि त्याच्या आईचं सेलिब्रेशन पाहिलंत का, श्रेयस तळपदेने शेअर केला Video

प्रतिक्षा लोणकर अन् श्रेयस तळपदेचा मजेशीर Video व्हायरल, चाहते म्हणतात, 'दामिनी मालिकेचं...'
सध्या सोशल मीडियावर रील्सचा सुळसुळाट आहे. कोणत्याही गाण्यावर अचानक रील्स व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटीच काय तर सामान्य माणूसही या रीलच्या मागे वेडा झाला आहे. अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केलाय. सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या रीलवरच त्यानेही रील बनवलं आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत आहे अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर (Pratiksha Lonkar). इतक्या वर्षांनी दोघांना एकत्र पाहून चाहते खूश झालेत.
प्रतिक्षा लोणकर आणि श्रेयस तळपदे या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. श्रेयसचा पहिला आणि सुपरहिट सिनेमा 'इक्बाल' मध्ये प्रतिक्षा लोणकर यांनी त्याच्या आईची भूमिका साकारली होती. तसंच प्रतिक्षा लोणकर यांच्या गाजलेल्या 'दामिनी' या मराठी मालिकेतही श्रेयस होता. श्रेयसने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यामध्ये श्रेयससोबतच प्रतिक्षा यांचाही जबरदस्त उत्साह आहे. 'इक्बाल आणि त्याची आई इक्बालचं क्रिकेटमधील साजरे करत आहेत.' असं कॅप्शन त्याने व्हिडिओला दिलं आहे.
श्रेयसने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. अभिनेत्री मुक्ता बर्वेनेही 'क्युट' अशी कमेंट केली आहे. 'बॅकग्राऊंडला दामिनीचं गाणं लावून अजून रील बनवा' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. मायलेकाची जोडी लय भारी अशाही कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
तर दुसरीकडे हे दोघं कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र आलेत असाही प्रश्न चाहत्यांना पडलाय. दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. श्रेयस तळपदेने नुकताच 'आपडी थापडी' या मराठी सिनेमात भूमिका साकारली. यामध्ये मुक्ता बर्वेसोबत त्याने स्क्रीन शेअर केली होती.