आता वाजणार ‘डंका’; मराठीतील पहिला रॅपर श्रेयस जाधवचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 19:06 IST2022-08-08T19:05:43+5:302022-08-08T19:06:06+5:30

‘डंका… हरी नामाचा’ हा चित्रपट केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. 

shreyas jadhav upcoming movie Danka coming soon | आता वाजणार ‘डंका’; मराठीतील पहिला रॅपर श्रेयस जाधवचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आता वाजणार ‘डंका’; मराठीतील पहिला रॅपर श्रेयस जाधवचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सध्याच्या काळात मराठी कलाविश्वात अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करण्यात येत आहे. यात ऐतिहासिकपासून धार्मिक चित्रपटांपर्यंत अनेक धाटणीच्या चित्रपटांचा समावेश आहे. यामध्येच आता श्रेयस जाधव दिग्दर्शित ‘डंका… हरी नामाचा’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

गणराज स्टुडओज् आणि रुद्र एंटरटेन्मेंट प्रस्तुत या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटावर काम सुरु असून २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ‘डंका… हरी नामाचा’ हा चित्रपट केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. 

"डंका… हरी नामाचा हा भव्य चित्रपट एक अॅक्शनपट असून त्याला विनोदाची जोड लाभली आहे. आजच्या खास दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून हळूहळू या चित्रपटाविषयीच्या अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर येतील. हल्ली प्रादेशिक चित्रपट पॅन इंडिया स्तरावर पोहोचत आहेत आणि मुळात मराठी चित्रपटांचा आशय हा अत्यंत दर्जेदार असतो. त्यामुळे मराठी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निमित्ताने मराठी चित्रपट पॅन इंडिया स्तरावर पोहोचतील," असं श्रेयस म्हणाला.

दिग्दर्शक श्रेयश जाधव याने मराठी सिनेसृष्टीला ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॅाप’, बाबू बॅन्ड बाजा’, ‘ऑनलाईन बिनलाईन’, ‘मी पण सचिन’ असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले. शिवाय आपल्या हटके मराठी रॅप साँगने तरूणाईलाही भुरळ घातली आहे.  पहिला मराठी रॅपर अशी ओळख मिळवणाऱ्या श्रेयशने सिनेसृष्टीला नेहमीच काहीतरी वैविध्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण काहीतरी पाहायला मिळेल. 

Web Title: shreyas jadhav upcoming movie Danka coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.