शिवानीच्या जन्मपत्रिकेमुळे झाली तिची 'झिम्मा 2' साठी निवड?; अभिनेत्रीने सांगितला भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:05 AM2023-12-06T09:05:57+5:302023-12-06T09:09:19+5:30

Shivani surve: शिवानीमुळे हेमंत ढोमेच्या सिनेमात यायच्या अडचणी? 'झिम्मा 2' च्यावेळी घेतला मोठा निर्णय

shivani-surve-share-incident-which-happen-with-jhimma-2-director-hemant-dhome | शिवानीच्या जन्मपत्रिकेमुळे झाली तिची 'झिम्मा 2' साठी निवड?; अभिनेत्रीने सांगितला भन्नाट किस्सा

शिवानीच्या जन्मपत्रिकेमुळे झाली तिची 'झिम्मा 2' साठी निवड?; अभिनेत्रीने सांगितला भन्नाट किस्सा

सध्या बॉक्स ऑफिसवर 'झिम्मा 2' हा सिनेमा चांगलाच हिट ठरतोय. त्यामुळे या सिनेमाविषयी आणि त्यातील अभिनेत्रींविषयी अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. यामध्येच या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी शिवानी सुर्वे ( Shivani surve) हिने 'झिम्मा 2' आणि एकंदरीतच हेमंत ढोमेसोबत (hemant dhome) काम करण्याचा अनुभव सांगितला. 'झिम्मा 2' मध्ये शिवानीला कास्ट करण्यापूर्वी तिला चक्क हेमंतला तिची जन्मपत्रिका दाखवावी लागली होती. त्यानंतर तिचं सिनेमात कास्टिंग झालं असा भन्नाट किस्सा तिने शेअर केला आहे.

अलिकडेच शिवानीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या करिअरविषयी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यात खासकरुन 'झिम्मा 2' मध्ये कास्ट होण्यापूर्वी तिला चक्क हेमंतला तिची जन्मपत्रिका दाखवावी लागली होती, असंही तिने सांगितलं.

"मी आणि हेमंत आम्ही दोघांनीही यापूर्वी एकत्र काम केलं आहे. त्याला मी वाळवी सिनेमाच्या स्क्रिनिंगला बोलावलं होतं. तेव्हा हेमंत झिम्मा २चं कास्टिंग करतोय याची मला जराही कल्पना नव्हती. त्यावेळी बोलताना मी सहज म्हणाले, तुला असं वाटतंय का माझ्यात काही प्रॉब्लेम आहे? म्हणून तू मला तुझ्या सिनेमात पुन्हा घेत नाहीयेस? सुरुवातीला त्याला काहीच कळलं नाही की मी काय म्हणतीये ते. या मागचं कारण असं की आम्ही एकत्र एक सिनेमा केला होता तो रिलीज व्हायला तब्बल चार ते साडेचार वर्ष लागली", असं शिवानी म्हणाली.

पुढे ती म्हणते,  "मला सिनेमात घेतलं की वेळ लागतो असा तुझा काही गैरसमज झालाय का? ही घे माझी पत्रिका, यात काहीच दोष नाहीये त्यामुळे मला कास्ट कर. आमचं हे बोलणं फार गमंतीत झालं होतं. पण, २-४ दिवसांनी खरंच त्याचा मला फोन आला आणि शिवानी पत्रिका कामी आली. माझ्या सिनेमात एक भूमिका आहे. तू करशील का? मी मनालीची गंभीर भूमिका करु शकते असा त्याला विश्वास होता. विशेष म्हणजे त्याचा विश्वास असणं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती."

दरम्यान, शिवानीने 'झिम्मा 2' या सिनेमात मनाली ही भूमिका साकारली आहे. यापूर्वी शिवानीने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. केवळ मराठीच नाही तर तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.
 

Web Title: shivani-surve-share-incident-which-happen-with-jhimma-2-director-hemant-dhome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.