'...ती सई चोर आहे', मृण्मयी देशपांडेने व्हिडीओ शेअर करत बहिण गौतमीवर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 18:53 IST2021-07-10T18:52:30+5:302021-07-10T18:53:10+5:30

मृण्मयी देशपांडे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने या व्हिडीओत बहिण गौतमीवर गंभीर आरोप केले आहेत.

'... she is a Sai thief', Mrinmayi Deshpande shares video and makes serious allegations against sister Gautami | '...ती सई चोर आहे', मृण्मयी देशपांडेने व्हिडीओ शेअर करत बहिण गौतमीवर केले गंभीर आरोप

'...ती सई चोर आहे', मृण्मयी देशपांडेने व्हिडीओ शेअर करत बहिण गौतमीवर केले गंभीर आरोप

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्यात पावलांवर पाऊल ठेवत तिची धाकटी बहिण गौतमी देशपांडे हिने देखील अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि तिने देखील अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली.  देशपांडे सध्या माझा होशील ना या मालिकेत सईची भूमिका साकारते आहे आणि तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. तर मृण्मयी सध्या सारेगमपा लिटिल चॅम्प्स शोचे सूत्रसंचालन करते आहे.


मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या देशपांडे बहिणी अभिनयाशिवाय बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत येत असतात. दरम्यान आता मृण्मयी देशपांडे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने या व्हिडीओत बहिण गौतमीवर गंभीर आरोप केले आहेत.


मृण्मयी देशपांडे हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, गौतमी देशपांडे अजूनही सुधारली नाहीये ही!! या व्हिडीओत मृण्मयी सांगते आहे की, मी आज मोठ्या बहिणीची व्यथा मांडायला हा व्हिडीओ करते आहे. मी आज गौतमीच्या घरात आहे आणि मी तिचे कपाट लावते आहे. मला सांगताना आनंद होतो आहे की आतापर्यंतचे माझे हरवलेले सगळे कपडे ए टू झेड कपडे मला मिळाले आहेत. माझ्या कपड्यांचे बोळे करून इतरत्र लपवण्यात आले होते. मी जेव्हा केव्हा विचारले की, गौतू, तुझ्याकडे माझे हे टॉप चुकून आले आहेत का? त्यावेळी मला नाही ताई, नाही ताई असेच सरळ उत्तर देण्यात आले आणि त्या कपाटामध्ये माझे सगळे कपडे लपवून ठेवलेल होते. तुम्ही ज्या सईवर प्रेम करता ती सई चोर आहे.


मृण्मयी देशपांडेच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. इतकेच नाही तर या व्हिडीओवर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत.

Web Title: '... she is a Sai thief', Mrinmayi Deshpande shares video and makes serious allegations against sister Gautami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.