फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज मराठी सिनेइंडस्ट्रीवर करतेय राज्य, ओळखलंत का तिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 16:08 IST2022-02-07T12:43:43+5:302022-02-07T16:08:56+5:30
बऱ्याचदा कलाकार त्यांच्या बालपणींचे फोटो आणि त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात.

फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज मराठी सिनेइंडस्ट्रीवर करतेय राज्य, ओळखलंत का तिला?
बऱ्याचदा कलाकार त्यांच्या बालपणींचे फोटो आणि त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान असाच एक मराठी चित्रपटसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीचाही बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील चिमुरडीला तुम्ही ओळखलंत का?, आम्ही तुम्हाला सांगतो की कोण आहे ही अभिनेत्री.
ही चिमुरडी दुसरी कोणी नसून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे(Mrunmayee Deshpande) आहे. अभिनेत्रीमृण्मयी देशपांडेने इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटो शेअर करताना, लाडीगोडी लावायचं काम लहानपणा पासूनसुरु आहे, असे कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. या फोटोत तिच्यासोबत तिची लहानबहीण आणि अभिनेत्री गौतमी देशपांडेदेखील आहे. या दोघी बहिणींनी मराठी अभिनय क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मृण्मयीच्या पावलांवर पाऊल ठेवत तिची बहिण गौतमीनेदेखील अभिनय क्षेत्राकडे वळली. दोघीही नेहमी एकमेंकीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. फोटोंमध्ये दोघींमधलं बॉन्डिंग नेहमी दिसतं.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा मृण्मयी देशपांडेने उमटविला आहे.