"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 16:57 IST2025-05-19T16:56:59+5:302025-05-19T16:57:37+5:30

शरद पोंक्षे यांनी मुलगा स्नेह याला दिलेला सल्ला सध्या चर्चेत आहे.

Sharad Ponkshe Gave Two Important Pieces Of Advice To His Son Sneh Stay Away From Women And Alcohol | "बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"

"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"

मराठी चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात. नाट्यसृष्टी बरोबरच चित्रपटामध्येही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका यशस्वीरित्या त्यांनी साकारल्या आहेत. आता शरद पोक्षे यांचा मुलगा स्नेह हा देखील 'बंजारा' या सिनेमातून दिग्दर्शनात आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.  अशा वेळी शरद पोंक्षेंनी त्याला दिलेला सल्ला सध्या चर्चेत आहे.

नुकतंच शरद पोंक्षे यांनी मुलासोबत 'राजश्री मराठी शोबझ'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बाप-लेकानं एकमेंकाविषयीच्या काही खास गोष्टी सांगितल्या. शरद पोंक्षे म्हणाले, "मी त्याला सांगितलंय की या क्षेत्रात दोन बा पासून लांब राहायचं, एक म्हणजे बाई आणि दुसरी बाटली. या दोन गोष्टी करिअरची वाट लावतात. बाईच्या नादाला लागलास की वाट लागते आणि बाटलीच्या नादाला लागलास की वाट लागते. प्रेम कर एखादीवर, पण मग ते निष्ठेने केलेलं प्रेम पाहिजे. दर दोन वर्षांनी प्रेम बदलत राहील असं काही करू नकोस, त्याला प्रेम म्हणत नाही. नाहीतर वाटोळ होईल", असा सल्ला लेकाला दिल्याचं सांगितलं. 



'बंजारा' या सिनेमाचं लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षेनं केलं आहे. मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार आहेत. येत्या १६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तीन मित्रांच्या मैत्रीची अनोखी कहाणी सांगणारा ‘बंजारा’ सिनेमा पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title: Sharad Ponkshe Gave Two Important Pieces Of Advice To His Son Sneh Stay Away From Women And Alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.