शुभंकरला वडिलांकडून मिळाली कौतुकाची थाप; व्हिडीओमध्ये दिसलं बाप-लेकाचं बॉण्डिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 17:16 IST2024-03-09T17:15:27+5:302024-03-09T17:16:09+5:30
Shubhankar twade: शुभंकर हा लोकप्रिय मराठी अभिनेता सुनील तावडे यांचा लेक आहे. कन्नी सिनेमाच्या प्रिमिअरच्या दिवशी या पिता-पुत्रामधील सुरेख बॉण्डिंग प्रेक्षकांना पाहायला मिळालं.

शुभंकरला वडिलांकडून मिळाली कौतुकाची थाप; व्हिडीओमध्ये दिसलं बाप-लेकाचं बॉण्डिंग
मराठी कलाविश्वात सध्या अभिनेत्री हृता दुर्गुळे (hruta durgule) आणि शुभंकर तावडे (shubhankar tawde) यांच्या 'कन्नी' (kanni) या सिनेमाची चर्चा आहे. नुकताच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या जोडीवर सध्या प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मात्र, प्रेक्षकांसोबतच शुभंकरच्या पाठीवर एका लोकप्रिय अभिनेत्याने कौतुकाची थाप दिली आहे. सध्या सोशल मीडियावर शुभंकर आणि या अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
काही दिवसांपूर्वी 'कन्नी' या सिनेमाचा प्रीमियर सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या प्रीमियरला लोकप्रिय अभिनेता आणि शुभंकरचे वडील सुनील तावडेदेखील (sunil tawde)आले होते. इतकंच नाही तर आपल्या लेकाला रुपेरी पडद्यावर पाहून ते भारावून गेले आणि त्यांनी कौतुकाने शुभंकरची पाठ थोपटली.
'कन्नी' चित्रपटासाठी शुभंकर तावडेला मिळाली बाबाकडून कौतुकाची थाप! pic.twitter.com/7MCZAW07TX
— Prasad_0507 (@panchalprasad68) March 9, 2024
सध्या सोशल मीडियावर या बाप-लेकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुनील तावडे तोंडभरुन शुभंकरचं कौतुक करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या निमित्ताने या पिता-पुत्राचं अनोखं बॉण्डिंगही पाहायला मिळालं.
दरम्यान, नुकताच कन्नी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात शुभंकरसोबत अभिनेत्री हृता दुर्गुळे हिनेदेखील स्क्रीन शेअर केली आहे.