Animal च्या 'जमाल कुडू'ची अर्धवटरावांना भुरळ; बॉबीच्या गाण्यावर रामदास पाध्येंच्या बाहुल्याने केला भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 19:04 IST2023-12-19T19:03:53+5:302023-12-19T19:04:59+5:30
Jamal kudu song: सत्यजीत पाध्ये यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर अर्धवटरावांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Animal च्या 'जमाल कुडू'ची अर्धवटरावांना भुरळ; बॉबीच्या गाण्यावर रामदास पाध्येंच्या बाहुल्याने केला भन्नाट डान्स
सध्या सगळीकडे रणबीर कपूरच्या (ranbir kapoor) अॅनिमल (animal) या एकाच सिनेमाची चर्चा रंगली आहे. या सिनेमातील डायलॉग्स, सीन आणि खासकरुन गाणी हे चर्चेचा विषय ठरत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमातील बॉबी देओलच्या (bobby deol) जमाल कुडू या गाण्याने तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या गाण्यावर भन्नाट रिल्स केले आहेत. यामध्येच आता रामदास पाध्ये यांच्या अर्धवटरावांनी सुद्धा हा ट्रेंड फॉलो केला आहे.
सध्या सोशल मीडियावर रामदास पाध्ये यांच्या बोलका बाहुला अर्थात अर्धवटराव याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने बॉबी देओलचं जमाल कुडू या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. इतकंच नाही तर त्याचा डान्स पाहिल्यावर आवडाबाई येते आणि तिच्या रागाचा पारा चढतो. हा व्हिडीओ सत्यजीत पाध्येने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
"अर्धवटराव व आवडाबाई हे सुप्रसिद्ध बाहुली जोडपं रामदास पाध्ये यांनी दूरदर्शन वर खूप गाजवलं. अर्धवटराव हा बाहुला रामदास पाध्ये यांच्या वडिलांनी म्हणजे यशवंत पाध्ये यांनी १९१७ साली घडवला व तो भारतातील विविध सामाजिक, संस्कृतिक, राजनैतिक, आर्थिक बदलांचा साक्षी आहे. त्याने त्याच्या खास शैलीत या सर्व बदलांवर टिप्पणी केली आहे. २०२३ च्या डिजिटल युगात तो आता यूट्यूब शॉर्ट्स व इन्स्टाग्राम रील्स वर येत आहे. या व्हिडीओमध्ये अर्धवटराव व आवडाबाई “जमाल कुडु” या “ animal” सिनेमातल्या गाण्यावर डान्स करत आहेत, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.
दरम्यान, या व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून सत्यजीत पाध्ये याने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. अर्धवटराव आणि आवडाबाई यांनी डिजिटल युगात पदार्पण केलं आहे. म्हणजेच आता त्यांचे असेच मजेशीर व्हिडीओ प्रेक्षकांना युट्यूब शॉर्ट्स आणि इन्स्टाग्राम रिल्सवर पाहता येणार आहेत.