"थोडा वेळ काढून माझ्या नाटकाला या..."; संकर्षणने केली विनंती, प्रशांत दामले म्हणाले- "जोपर्यंत लोक..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:50 IST2025-11-10T11:50:28+5:302025-11-10T11:50:54+5:30
संकर्षण कऱ्हाडे आणि प्रशांत दामलेंची भेट पुण्यात झाली. दोघेही गाडीत होते. त्यावेळी संकर्षणने घडलेला खास किस्सा सांगितला

"थोडा वेळ काढून माझ्या नाटकाला या..."; संकर्षणने केली विनंती, प्रशांत दामले म्हणाले- "जोपर्यंत लोक..."
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षण सध्या टीव्ही, सिनेमा आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात काम करतोय. संकर्षणचं फॅन फॉलोईंग इतकं आहे त्याच्या नाटकांना प्रेक्षक हाउसफुल्ल गर्दी करत आहेत. प्रशांत दामले निर्मित संकर्षणचं 'कुटुंब कीर्रतन' हे नाटक सध्या रंगभूमीवर प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादात सुरु आहे. यादरम्यान संकर्षणच्या आयुष्यात खास किस्सा घडला. जेव्हा भर रस्त्यात संकर्षण आणि प्रशांत दामलेंची भेट झाली. तेव्हा काय घडलं?
संकर्षणने नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन त्याखाली कॅप्शन लिहिलं आहे. या फोटोत संकर्षण त्याच्या गाडीत असून समोरच्या गाडीत प्रशांत दामले बसलेले दिसत आहेत. संकर्षणने हा फोटो पोस्ट करुन लिहिलं की, ''ओळखा पाहू पलिकडच्या गाडीत आहे कोण …? आज पुण्यात अशी भेट झाली आमची … मी दामले सरांना म्हणालो, “थोडा वेळ काढा आणि तुमचीच निर्मिती असलेल्या माझ्या नाटकाला या कि हो …” त्यावर आमचे दामले सर त्यांच्याच स्टाईल ने म्हणाले “जोपर्यंत लोक येतायेत तोपर्यंत मी नाही आलो तरी चालेल…”
अशाप्रकारे संकर्षणने लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे. संकर्षणच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केला आहे. संकर्षण आणि प्रशांत दामले हे सध्या मराठी रंगभूमीवर सक्रीय आहेत. प्रशांत दामलेंचं शिकायला गेलो एक आणि एका लग्नाची पुढची गोष्ट ही दोन नाटकं सुरु आहेत. तर संकर्षण 'नियम व अटी लागू' आणि 'कुटुंब कीर्रतन' या दोन नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. संकर्षणच्या रंगभूमीवरील कारकीर्दीत प्रशांत दामलेंचं मोलाचं योगदान आहे.