'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 09:06 IST2025-09-04T09:06:19+5:302025-09-04T09:06:51+5:30

शुभांगीचा पती आनंद हा नाटकाचा संगीतकारच आहे.

sangeet devbabhali natak fame actress shubhangi sadavarte took divorce from husband anand oak | 'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."

'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."

मराठीतील 'संगीत देवबाभळी' (Sangeet Devbabhali) हे नाटक गेल्या काही महिन्यांपासून जोरात सुरु आहे. नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. नाटकात शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शुभांगी सदावर्तेने नाटकात आवलीची भूमिका साकारली आहे. शुभांगीचा नवरा आनंद ओकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पत्नीपासून घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. 

आनंद ओक यांनी पोस्ट शेअर करत लिहिले, "प्रिय मित्रांनो, काही वर्षांपूर्वीच शुभांगी आणि मी परस्पर सहमतीने विभक्त झालो आहोत. हा निर्णय पचवण्यासाठी आणि त्यावर ठाम राहण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला पण आता हे जाहीर करण्याची हीच योग्य आहे असं वाटलं म्हणून ही पोस्ट लिहित आहे. आतापर्यंतच्या एकमेकांसोबतचा प्रवासासाठी मी कायमच आभारी असेन."

त्यांनी पुढे लिहिले, "मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. ती खूप चांगली अभिनेत्री आणि व्यक्ती आहे. याआधी केलं तसंच यापुढेही जेव्हाही संधी मिळेल आम्ही एकमेकांसोबत नक्कीच काम करु."


आनंद ओक हे संगीतकार आहेत. 'संगीत देवबाभळी'या नाटकाचं संगीत खूप लोकप्रिय झालं. आनंद ओक यांनीच याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर दुसरीकडे शुभांगी सदावर्ते 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमातही दिसली होती. तसंच स्टार प्रवाहवरील 'लक्ष्य' या मालिकेतही तिने काम केलं होतं. तिचं 'संगीत देवबाभळी' हे नाटक गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. काही वर्षांपूर्वी नाटकाचे प्रयोग बंद होणार होते मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता नाटकाने पुन्हा जोर धरला. 

Web Title: sangeet devbabhali natak fame actress shubhangi sadavarte took divorce from husband anand oak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.