रमेश चौधरी यांच्या शैलीतून उलगडणार ‘सालबर्डी’चा थरार, चाहत्यांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 15:21 IST2026-04-13T15:20:05+5:302026-04-13T15:21:27+5:30

गुल्हर, बाबो, पाणीपुरी यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनंतर ‘सालबर्डी’मधून रमेश चौधरी प्रेक्षकांना एका गूढ आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रवासावर घेऊन जाणार आहेत.

salbardi marathi movie starring pooja sawant in role of P I Manorama directed by rameh choudhary | रमेश चौधरी यांच्या शैलीतून उलगडणार ‘सालबर्डी’चा थरार, चाहत्यांमध्ये उत्सुकता

रमेश चौधरी यांच्या शैलीतून उलगडणार ‘सालबर्डी’चा थरार, चाहत्यांमध्ये उत्सुकता

चित्रपट ही केवळ कथा नसते ती एक भावनांची, दृश्यांची आणि विचारांची गुंफण असते. यातील प्रत्येक धागा योग्य ठिकाणी बांधण्याचं कौशल्य दिग्दर्शकाकडे असतं. म्हणूनच चित्रपटाच्या यशाचं खरं सूत्र दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनात आणि मांडणीत दडलेलं असतं. सक्षम निर्मितीमूल्यांची जोड मिळाली, की ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. अशाच वेगळ्या वाटेवर चालणारे, आशयघन आणि प्रभावी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी आता प्रेक्षकांसाठी एक नवा, थरारक अनुभव घेऊन येत आहेत ‘सालबर्डी’. 

सामाजिक आणि वास्तववादी विषयांवर ठसा उमटवणाऱ्या चौधरी यांनी यावेळी रहस्य आणि थरार यांची सांगड घालत एक उत्कंठावर्धक कथा पडद्यावर साकारली आहे. निर्माते अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांची भक्कम साथ लाभलेला हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारला असून, येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

गुल्हर, बाबो, पाणीपुरी यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनंतर ‘सालबर्डी’मधून रमेश चौधरी प्रेक्षकांना एका गूढ आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रवासावर घेऊन जाणार आहेत.  याबाबत ते सांगतात, “मला नेहमीच वेगळ्या कथा सांगायला आवडतात. ‘सालबर्डी’च्या माध्यमातून प्रेक्षकांना अशा एका रहस्यमय प्रवासावर नेण्याचा प्रयत्न आहे, जिथे प्रत्येक क्षणी नवं काहीतरी उलगडत जातं. हा केवळ मनोरंजनासाठीचा चित्रपट नाही, तर विचार करायला भाग पाडणारा आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा अनुभव आहे.”

चित्रपटाची कथा गूढ घटनांच्या साखळीतून उलगडत जाते. प्रत्येक प्रसंगात दडलेलं रहस्य, अनपेक्षित वळणं आणि अंगावर काटा आणणारे क्षण प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवतात. ‘सालबर्डी’ हा केवळ थरारपट नाही, तर मनात प्रश्न निर्माण करणारा, अस्वस्थ करणारा आणि दीर्घकाळ लक्षात राहणारा अनुभव ठरणार आहे.

दुर्गम महाराष्ट्रातील ‘सालबर्डी’ गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा भय आणि रहस्य यांचा थरारक संगम साकारते. या चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर या दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

रमेश चौधरी यांच्या दिग्दर्शनातील ‘सालबर्डी’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक वेगळा आणि महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच निर्माण झालेली उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.  १७ एप्रिलला महाराष्ट्रभरात ‘सालबर्डी’ चित्रपट  प्रदर्शित होणार आहे.

Web Title : रमेश चौधरी की 'सालबर्डी': रोमांचक रहस्य का खुलासा, उत्साह चरम पर

Web Summary : निर्देशक रमेश चौधरी की 'सालबर्डी', महाराष्ट्र के ग्रामीण इलाके में स्थापित एक रहस्यमय थ्रिलर, सस्पेंस और विचारोत्तेजक क्षणों का वादा करती है। पूजा सावंत और शशांक शेंडे अभिनीत, 17 अप्रैल को रिलीज होने वाली यह फिल्म सालबर्डी गांव में रहस्यमय घटनाओं की एक श्रृंखला की पड़ताल करती है, जो एक अनूठा सिनेमाई अनुभव प्रदान करती है।

Web Title : Ramesh Choudhary's 'Salberdi': A Thrilling Mystery Unfolds, Excitement Builds

Web Summary : Director Ramesh Choudhary's 'Salberdi,' a mystery thriller set in rural Maharashtra, promises suspense and thought-provoking moments. Featuring Pooja Sawant and Shashank Shende, the film, releasing April 17th, explores a chain of mysterious events in Salberdi village, offering a unique cinematic experience.