'सैराट'ला 4 वर्षे झाली पूर्ण, रिंकू राजगुरू म्हणतेय - 'सैराटच्या नावानं चांगभलं'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 17:08 IST2020-04-29T17:07:05+5:302020-04-29T17:08:24+5:30
4 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी

'सैराट'ला 4 वर्षे झाली पूर्ण, रिंकू राजगुरू म्हणतेय - 'सैराटच्या नावानं चांगभलं'
4 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली. तिचा प्रत्येक डायलॉग, तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली. या चित्रपटाला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत.
सैराटला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, सैराटला आज 4 वर्ष पुर्ण झाली. तरीही सगळे आर्ची, परश्या आणि त्यातल्या सगळ्याच पात्रांवर अजुनही तितकंच प्रेम करतात.सगळ्यांचे खुप खुप आभार आणि सर्वांना माझ्याकडून सदिच्छा. सैराटच्या नावान चांगलभल. घरी रहा,सुरक्षित रहा.काळजी घ्या.
चार वर्षे सैराट चित्रपटाला रिलीज होऊन झाली असतील तरीदेखील आर्ची व परशाचे रसिकांच्या मनात स्थान कायम आहे.
या चित्रपटामुळे एका रात्रीत रिंकू राजगुरू व आकाश ठोसरचे आयुष्य बदलून गेले. आकाश व रिंकू सैराटशिवाय काही मराठी चित्रपटात झळकले आणि हिंदी वेबसीरिजमध्येही दिसले.