'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 10:57 IST2025-06-17T10:56:17+5:302025-06-17T10:57:15+5:30
Sairat Movie : नागराज मंजुळेंच्या 'सैराट' चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. या चित्रपटातील एक अभिनेता लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे.

'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
नागराज मंजुळें(Nagraj Manjule)च्या 'सैराट' चित्रपटाने (Sairat Movie) मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. २०१६ साली आलेल्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. सैराटने १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याची हृदयस्पर्शी प्रेमकथा प्रेक्षकांना भावली होती. या चित्रपटातील सल्याचे पात्र तुम्हाला नक्कीच आठवत असेल. ही भूमिका अरबाज शेख(Arbaaz Shaikh)ने साकारली होती. आता अरबाज चर्चेत आला आहे. तो लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
हो. तुम्ही ऐकलंत ते खरंय. अरबाज शेख लवकरच त्याची गर्लफ्रेंड सिमरनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. २०१९ सालापासून ते दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. सिमरन पुण्यात राहते. त्यामुळे तिने अरबाजच्या यशाचा प्रवास खूप जवळून पाहिला आहे. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्यांनी उघडपणे प्रेमाची कबुली दिली आहे आणि लवकरच ते लग्न करणार असल्याचे बोलले जाते.
वर्कफ्रंट
अरबाज शेखने सैराट चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले. या चित्रपटातून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तो यारी, संघर्ष योद्धा जरांगे पाटील, मुसंडी, घर बंदूक बिर्याणी, झुंड, एकदम कडक अशा चित्रपटांमध्ये झळकला. तसेच अरबाजने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. काही महिन्यांपूर्वी त्याने पुण्यात वडगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूटजवळ ‘बेक बडीज’ नावाने केक आणि कॅफे सुरू केले.