परश्याची आर्ची पडली प्रेमात? व्हॅलेंटाइन डेला रिंकूने शेअर केला 'तो' फोटो, चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 16:59 IST2024-02-14T16:58:14+5:302024-02-14T16:59:20+5:30
Rinku rajguru: रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

परश्याची आर्ची पडली प्रेमात? व्हॅलेंटाइन डेला रिंकूने शेअर केला 'तो' फोटो, चर्चेला उधाण
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (rinku rajguru). उत्तम अभिनयाच्या जोरावर रिंकूने मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे कमी वयात तिने अपार लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक माहिती खोलात जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यात खासकरुन तिचं लव्हलाइफ, तिची फॅमिली यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न चाहत्यांचा असतो. यामध्येच आता रिंकूने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत एक फोटो पोस्ट केला आहे. ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती सतत या ना त्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यात नुकतीच रिंकूने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना व्हॅलेंटाइन डेच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छ धरला असून त्याच्यामागे तिचा चेहरा फोटो लपवला आहे. विशेष म्हणजे तिचा हा फोटो तिने पूर्वी केलेल्या एका फोटोशूटपैकी एक असल्याचं लक्षात येत आहे. परंतु, तिचा हा फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांना आता पुन्हा तिच्या लव्हलाइफविषयी प्रश्न पडला आहे. इतकंच नाही तर तिच्या आयुष्यात अशी कोणती खास व्यक्ती आहे का? हे जाणून घेण्याचाही ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सध्या रिंकूच्या या फोटोची नेटकऱ्यांमध्ये जबरदस्त चर्चा होत आहे.