'सैराट' फेम अभिनेत्याने गेल्या वर्षात गर्लफ्रेंडसोबत केलं गुपचूप लग्न, अन् आता झालाय बाबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 10:56 IST2025-08-06T10:55:33+5:302025-08-06T10:56:17+5:30
'Sairat' fame actor Tanaji Galgunde: तानाजीने काही महिन्यांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल खुलासा केला होता आणि तो तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचेही सांगितले होते. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, तानाजीने गेल्या वर्षी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केले आणि नुकताच त्यांना पहिलं अपत्य प्राप्त झालं आहे.

'सैराट' फेम अभिनेत्याने गेल्या वर्षात गर्लफ्रेंडसोबत केलं गुपचूप लग्न, अन् आता झालाय बाबा
नागराज मंजुळेंच्या 'सैराट' (Sairat Movie) चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. या चित्रपटातील आर्ची आणि परश्याची प्रेमकथा प्रेक्षकांना भावली होती. या चित्रपटातून रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर ही जोडी लोकप्रिय झाली. त्यांच्यासोबत सल्या आणि लंगड्या या पात्रांनाही प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. लंगड्याची भूमिका अभिनेता तानाजी गळगुंडे(Tanaji Galgunde)नं साकारली होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी तानाजीने त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल खुलासा केला होता आणि तो तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचेही सांगितले होते. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, तानाजीने गेल्या वर्षी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केले आणि नुकताच त्यांना पहिलं अपत्य प्राप्त झालं आहे.
तानाजी गळगुंडेने गर्लफ्रेंड प्रतीक्षा शेट्टीसोबत डिसेंबर, २०२४ रोजी गुपचूप लग्न केले. यावेळी त्या दोघांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यानंतर जून महिन्यात प्रतीक्षाचे डोहाळे जेवण पार पडले. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आता काही दिवसांपूर्वी तिने पहिल्या अपत्याला जन्म दिल्याचे समजते आहे. त्यामुळे तानाजी आता बाबा झाला आहे. मात्र अद्याप त्याने लग्न आणि अपत्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
आईचा अभिनेत्याच्या लग्नाला होता विरोध
तानाजी आणि प्रतीक्षाच्या नात्याला सुरुवातीला अभिनेत्याच्या आईचा विरोध होता. ती वेगळ्या कास्टची असल्यामुळे त्यांनी हे नाते स्वीकारले नव्हते. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत, हे समजल्यावर तानाजीच्या आईने त्याच्यासोबत भांडण केलं होतं. कारण त्याच्या आईला माहित होतं की ती दुसऱ्या कास्टची आहे आणि तिची आई आमच्या गावातली आहे. त्यामुळे प्रतीक्षा तिला सून म्हणून नको होती. त्याची आई तानाजीला म्हणाली होती की, तू दुसरी कोणीही कर अगदी दुसऱ्या कुठल्याही जातीची कर पण तिला करू नको, कारण ती मुलगी आपल्या गावातल्या लोकांना माहितीतली आहे असं तिचं म्हणणं होतं. ती वेगळ्या जातीची आहे हे गावातल्या लोकांना समजू नये, म्हणून ती असं म्हणत होती. पण आईचं म्हणणं तानाजीला पटत नव्हतं. मात्र कालांतराने आईने त्यांचे नाते स्वीकारले.