Rinku Rajguru :  एवढा पैसा आलाय तर तो दात का काढत नाहीस? आर्चीचा व्हिडीओ अन् चाहत्यांच्या कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 04:55 PM2023-01-02T16:55:20+5:302023-01-02T16:55:45+5:30

Rinku Rajguru : होय, बॅकग्राऊंडमध्ये दीपिकाचं ‘बेशरम रंग’ हे गाणं वाजतंय आणि आर्ची त्यावर वेगवेगळ्या पोझ देतेय. आर्चीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत....

sairat archi aka Rinku Rajguru share video dancing on besharam rang song | Rinku Rajguru :  एवढा पैसा आलाय तर तो दात का काढत नाहीस? आर्चीचा व्हिडीओ अन् चाहत्यांच्या कमेंट्स

Rinku Rajguru :  एवढा पैसा आलाय तर तो दात का काढत नाहीस? आर्चीचा व्हिडीओ अन् चाहत्यांच्या कमेंट्स

googlenewsNext

‘सैराट’ चित्रपटातून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku  Rajguru) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. आपले नवनवे फोटो शेअर करून रिंकू नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या मात्र चर्चा आहे ती ‘बेशरम रंग’ या गाण्यावरच्या आर्चीच्या अदांची. होय, बॅकग्राऊंडमध्ये दीपिकाचं ‘बेशरम रंग’ हे गाणं वाजतंय आणि आर्ची त्यावर वेगवेगळ्या पोझ देतेय. तिच्या या अदा पाहून चाहते नुसते घायाळ झाले आहेत. आर्चीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. यातल्या काही कमेंट्स चांगल्याच भन्नाट आहेत.

आर्ची कसली दिसतेय ग तू..., अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. लय चिकनी दिसत्यास रिंकू, कधी येणार आहेस गावी, गेट टूगेदर आहे आपल्या शाळेचं, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.   कॅमेरा कोण पकडतो? असा सवाल एक युजरने केला आहे. आईला दीपिका..., अशी कमेंटही कमेंट बॉक्समध्ये पडली आहे. आय लव्हू यू रिंकू...च्या मॅसेजचा तर जणू पूर आला आहे.

एका युजरची कमेंट सर्वाधिक लक्ष वेधून घेतेय. एवढा पैसा आलाय तर तो दात का काढत नाहीस? अशी मजेशीर कमेंट या चाहत्याने केली आहे.

एकंदर काय तर रिंकूच्या या व्हिडीओनं चाहत्यांना याड लावलं आहे. व्हिडीओत रिंकूने लाल रंगाचा एक स्टायलिश आऊटफिट परिधान केला आहे. आऊटफिट जरी वेस्टर्न लूकचा असला, तरी त्याला एका पारंपारिक टच देण्यात आला आहे. छोटे केस, गळ्यात मोत्यांची माल आणि  घायाळ करणारं चेहºयावरचे भाव तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.  

Web Title: sairat archi aka Rinku Rajguru share video dancing on besharam rang song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.