सिद्धार्थच्या अफेअरबद्दल समजताच सई म्हणाली, 'ही...?', मितालीला बघताच अशी होती प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 12:16 IST2024-01-17T12:15:12+5:302024-01-17T12:16:24+5:30

'१०-१२ वर्षांच्या मितालीला मी पाहिलंय' सई ताम्हणकरने केला खुलासा

Saie Tamhankar s reaction after knowing about siddarth chandekar and mitali mayekar s affair | सिद्धार्थच्या अफेअरबद्दल समजताच सई म्हणाली, 'ही...?', मितालीला बघताच अशी होती प्रतिक्रिया

सिद्धार्थच्या अफेअरबद्दल समजताच सई म्हणाली, 'ही...?', मितालीला बघताच अशी होती प्रतिक्रिया

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा येतोय. खऱ्या आयुष्यात एकमेकांचे एवढे चांगले मित्र असणारे हे दोघं मोठ्या पडद्यावर रोमँटिक भूमिका साकारत आहेत. सईला जेव्हा सिद्धार्थ आणि मितालीच्या अफेअरबद्दल समजलं तेव्हा तिची काय रिअॅक्शन होती याचा किस्साही तिने सांगितला. 

'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली, "सिद्धार्थने पहिल्यांदा मितालीसोबतचा सेल्फी शेअर केला होता. तेव्हा सईने त्याला चिडवणारा रिप्लाय दिला होता. यावेळी सईने एक किस्साही सांगितला. ती म्हणाली,'जेव्हा मी मितालीसोबत याचा फोटो बघितला तेव्हा माझं असं झालं की, ही...?' याचं कारण हे की, मिताली आणि मी अनुबंध नावाच्या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हा मिताली अगदी एवढीशी होती. १० ते १२ वर्षांची मिताली मी पाहिली आहे. मग माझं असं झालं की हा काय योगायोग आहे? मितालीसोबत याचं कसं आणि कुठे जमलं असा मला प्रश्न पडला."

सई पुढे म्हणाली, "मित्रांच्या बाबतीत नेहमी असं असतं की तू खूश आहेस ना? मग ठीक आहे. सिद्धार्थच्या बाबतीतही माझं असंच आहे. उद्या तो पाप जरी करुन आला तरी मी तिला पाठीशी घालेन एवढं माझं त्याच्यावर प्रेम आहे. तुला ओके वाटलं आहे ना हे मग ठीके मी आहे तुझ्यासोबत अशी मैत्री असल्यामुळे मी फार प्रश्न विचारले नाहीत. कारण मी मितालीला ओळखत होते. तेव्हा ती लहान असली तरी माणूस कळतोच की आपल्याला. त्यामुळे फक्त खूश आहेस ना नक्की आहे ना, म्हणजे हेच फायनल आहे का? एवढं विचारलं."

सई आणि सिद्धार्थचा 'श्रीदेवी प्रसन्न' 4 फेब्रुवारी 2024 रोजी रिलीज होत आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. तर विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

Web Title: Saie Tamhankar s reaction after knowing about siddarth chandekar and mitali mayekar s affair