सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'त्या' पोस्टमुळे रंगल्या चर्चा; म्हणाली, "सिंगल असणं ही माझी चॉईस.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 10:12 IST2024-08-19T10:11:04+5:302024-08-19T10:12:04+5:30

सईचं ब्रेकअप झाल्याची चर्चा तिच्या एका पोस्टवरून सुरु झाली आहे.

Sai Tamhankar shared cryptic post saying she is single by choice she had breakup | सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'त्या' पोस्टमुळे रंगल्या चर्चा; म्हणाली, "सिंगल असणं ही माझी चॉईस.."

सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'त्या' पोस्टमुळे रंगल्या चर्चा; म्हणाली, "सिंगल असणं ही माझी चॉईस.."

अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) मराठीसह हिंदीतही अभिनयाचा डंका गाजवत आहे. सईने मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर नाव कमावलं आहे. गेल्या काही वर्षात तिचं प्रोफेशनल आयुष्य रुळावर आलं आहे. वैयक्तिक आयुष्यात मात्र सईने पहिला घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा लग्नच केलं नाही. यानंतर ती रिलेशनशिपमध्ये आली मात्र अद्याप लग्नबंधनात अडकलेली नाही. आता नुकतंच सईचं ब्रेकअप झाल्याची चर्चा तिच्या एका पोस्टवरून सुरु झाली आहे.

सई ताम्हणकर निर्माता अनिश जोगला डेट करत असल्याची चर्चा होती. दोघांच्या व्हॅकेशनचे एकत्रित फोटोही व्हायरल झाले होते. अनिशच्या फोटोंवर सईने कमेंट्सही केल्या. मात्र आता सईच्या लेटेस्ट पोस्टमुळे तिच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरीवर तिने पोस्ट शेअर केली आहे. यात म्हणलं आहे की, 'मी माझ्या मर्जीने सिंगल आहे. ही माझी निवड नाही. पण तरी ही माझी मर्जी आहे.'#Truestory (मी माझ्या स्वत:च्या मर्जीने एकटी आहे. नाईलाज असला तरी मला एकटं राहावं लागतंय.)

सई ताम्हणकर २०१३ मध्ये अमेय गोसावीसोबत लग्नबंधनात अडकली होती. मात्र लग्नानंतर दोनच वर्षात 2015 साली त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर गेल्या काही वर्षांपासून ती अनिश जोगला डेट करत होती. त्याच्यासोबतचे फोटो पोस्ट करुन तिने नातं कबूलही केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने त्याच्यासाठी एकही पोस्ट केली नाही. आता या स्टोरीमुळे तिच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Web Title: Sai Tamhankar shared cryptic post saying she is single by choice she had breakup