या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून फॅन्स म्हणाले सुपर सेक्सी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 07:15 IST2019-11-12T07:15:00+5:302019-11-12T07:15:00+5:30
आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाजामुळे ही अभिनेत्री चर्चेत असते.

या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून फॅन्स म्हणाले सुपर सेक्सी
आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते. सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते.
सईने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो शूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. लाल रंगाच्या ब्लॅझरमध्ये सई हॉट दिसतेय. तिच्या या फोटोला खूप पसंती मिळते आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोवर करण्यात आला आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.
मराठीतल्या 'मला आई व्हायचंय' या चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे. या सिनेमात क्रिती सॅनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका आहे. लक्ष्मण उतेकर यांनी याआधी लुका छुपी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा दुसरा हिंदी सिनेमा आहे. सईने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन सिनेमाचे शूटिंग सुरु करत असल्याची माहिती दिली होती.