६१ वर्षीय 'या' अभिनेत्याचे फोटो बघून सई ताम्हणकर घायाळ, कमेंट करत म्हणाली-

By देवेंद्र जाधव | Updated: May 31, 2025 13:39 IST2025-05-31T13:37:12+5:302025-05-31T13:39:01+5:30

सई ताम्हणकरने साठी ओलांडलेल्या एका अभिनेत्याच्या फोटोवर केलेल्या कमेंटकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. कोण आहे हा अभिनेता?

Sai Tamhankar romantic caption for hollywood actor brad pitt after seeing his photo | ६१ वर्षीय 'या' अभिनेत्याचे फोटो बघून सई ताम्हणकर घायाळ, कमेंट करत म्हणाली-

६१ वर्षीय 'या' अभिनेत्याचे फोटो बघून सई ताम्हणकर घायाळ, कमेंट करत म्हणाली-

सई ताम्हणकर (sai tamhankar) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सईला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. सईने गेल्या काही वर्षांमध्ये मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःचं नाव कमावलं. हिंदी सिनेमेच नव्हे तर ओटीटी विश्वातही सध्या सईचा दबदबा आहे. अशातच सईची एक पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली आहे. ६१ वर्षीय एका सुपरस्टारचे फोटो पाहून सई ताम्हणकर घायाळ झालेली दिसत आहे. कोण आहे तो?

६१ वर्षीय सुपरस्टारच्या फोटोंवर सई फिदा

सई ताम्हणकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सई ताम्हणकर विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच सईची पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका ६१ वर्षीय अभिनेत्याचे फोटो शेअर करुन त्यावर Hayeee!!! असं कॅप्शन लिहून प्रेम दर्शवलं आहे. हा अभिनेता आहे ब्रॅड पिट.हॉलिवूड अभिनेता आणि वयाची साठी ओलांडलेल्या ब्रॅडने सोशल मीडियावर खास फोटोशूट पोस्ट केलंय. हे फोटोशूट रिपोस्ट करुन सई ब्रॅड पिटवर फिदा झालेली दिसतेय. 

सईचं वर्कफ्रंट

सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती नुकतीच 'गुलकंद' या मराठी सिनेमात झळकली. या सिनेमातील सईच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. इतकंच नव्हे तर सई आणि समीर चौघुले ही खास जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. याशिवाय गेल्या काही महिन्यात सई ताम्हणकर 'डब्बा कार्टल', 'क्राईम बीट' या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकली. सई सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये प्रसाद ओकसोबत कॉमेडी स्कीटचं परीक्षण करताना दिसते.

Web Title: Sai Tamhankar romantic caption for hollywood actor brad pitt after seeing his photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.