'शूटिंगच्या दोन दिवस आधी मला रिप्लेस केलं', अचानक एका सिनेमातून सई ताम्हणकरला दाखवला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 01:55 PM2024-01-30T13:55:56+5:302024-01-30T14:01:32+5:30

आज सई मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्री आहे. मात्र, सईनं करिअरमध्ये अनेक अडथळ्यांचा सामना केला.

Sai Tamhankar Opens Up About Got Replaced By Another Actress In Marathi Movie | 'शूटिंगच्या दोन दिवस आधी मला रिप्लेस केलं', अचानक एका सिनेमातून सई ताम्हणकरला दाखवला बाहेरचा रस्ता

'शूटिंगच्या दोन दिवस आधी मला रिप्लेस केलं', अचानक एका सिनेमातून सई ताम्हणकरला दाखवला बाहेरचा रस्ता

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकरचं नाव कायमच घेतलं जातं. फक्त मराठी नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही सईने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिचे फॅन फॉलोईंगही फार मोठे आहे.  गेल्या काही दिवसांपासून सई ताम्हणकर सातत्याने चर्चेत येत आहे. आतापर्यंत तिने तिच्या करिअरविषयी आणि इंडस्ट्रीत तिला मिळालेल्या वागणुकीविषयी बऱ्याचदा उघडपणे भाष्य केलं आहे. यामध्येच तिने एका सिनेमातून तिला अचानकपणे रिप्लेस केल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर इंडस्ट्रीमधील तिच्या स्ट्रगलबद्दल सुद्धा तिने यावेळी सांगितलं.

अलिकडेच सई ताम्हणकरने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. सई म्हणाली, 'एका फिल्ममधे माझं कास्टिंग झालं होतं. दोन दिवस आधी म्हणजे परवा शूटिंग आहे तर मला कळालं की मला बदलण्यात आलंय. मला अचानक रिप्लेस करण्यात आलं होतं. माझ्याजागी दुसरी अभिनेत्री काम करतेय, हे कळालं'.

'मला काढून टाकलं गेलंय. कारण काय होतं तर माझ्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्या दिग्दर्शकाचं म्हणणं होतं. माझ्याशी काहीही न बोलता, शहानिशा न करता हा निर्णय घेतला गेला'. यासोबतच सईने मुलाखतीमध्ये मराठी सिनेसृष्टीमधील रिजेक्शन, बॉलिवूडमध्ये तिला मिळालेली वागणूक, लग्न आणि जोडीदाराबद्दलच मत यासर्व गोष्टींवर तिनं दिलखुलासपणे उत्तरं दिली. 

सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास,  लवकरच ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सई अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर पाहायला मिळणार आहे. सध्या ती याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. २ फेब्रुवारीला सई व सिद्धार्थचा ‘श्रीदेव प्रसन्न’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, सिनेमातील गाणीही व्हायरल झाली आहेत. 
 

Web Title: Sai Tamhankar Opens Up About Got Replaced By Another Actress In Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.