धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 14:46 IST2025-10-31T14:45:59+5:302025-10-31T14:46:30+5:30
मुलांना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. पण, आता त्याच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहित आर्याने काही मराठी सेलिब्रिटींनाही संपर्क केल्याचं उघड झालं आहे.

धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
ऑडिशनच्या नावाखाली मुलांना बोलावून पवईच्या स्टुडिओत १७ मुलांना ओलीस ठेवल्याची खळबळजनक घटना गुरुवारी(३० ऑक्टोबर) मुंबईतील पवईमधील आरए स्टुडिओमध्ये घडली. मुलांना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. पण, आता त्याच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहित आर्याने काही मराठी सेलिब्रिटींनाही संपर्क केल्याचं उघड झालं आहे.
चित्रपट निर्माता असल्याचं सांगून काही मराठी कलाकारांसोबत त्याने संपर्क केला होता. रुचिता जाधव, गिरिश ओक आणि उर्मिला कोठारे यांना रोहित आर्याने आरए स्टुडिओमध्ये बोलवलं होतं. गिरीश ओक आणि उर्मिलासोबत अन्य काही सेलिब्रिटींनीही आरए स्टुडिओला काही दिवसांपूर्वीच भेट दिली होती. ऑडिशन सुरू असलेल्या मुलांशी कलाकारांनी संवादही साधला होता, अशी माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. एका वेबसीरिजचं शूटिंग सुरू करणार असल्याचं सांगून रोहित आर्याने या कलाकारांना संपर्क साधला होता.

रुचिता जाधवने इन्स्टावर पोस्ट करुन घडलेला प्रकार सांगितला आहे. तसंच रोहितने जी वेब सीरिजची स्टोरी सांगितली तोच त्याचा प्लॅन होता, असा खुलासा रुचिताने केला आहे. त्यामुळे अभिनेत्रीलाही धक्का बसला आहे. 'लेट्स चेंज ४' ही वेब सीरिज तयार करतोय, असं सांगत रोहित आर्यने काही मराठी सेलिब्रिटींशी संपर्क साधला होता. मराठी सेलिब्रिटींना स्टुडिओत बोलवण्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण, मराठी कलाकारांना टार्गेट करण्याचा त्याचा प्लॅन होता का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
