भरगर्दीत रिंकू राजगुरुला झाली धक्काबुक्की, संतप्त अभिनेत्री म्हणाली, तुमची मुलगी असती तर..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 10:37 IST2024-03-04T10:37:10+5:302024-03-04T10:37:36+5:30

Rinku rajguru: पहिल्यांदाच रिंकूच्या रागाचा पारा चढल्याचं चाहत्यांनी पाहिलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे.

rmarathi actress inku-rajguru-lashed-out-at-fans-for-misbehaviour-after-cultural-festival-in-jalgaon | भरगर्दीत रिंकू राजगुरुला झाली धक्काबुक्की, संतप्त अभिनेत्री म्हणाली, तुमची मुलगी असती तर..?

भरगर्दीत रिंकू राजगुरुला झाली धक्काबुक्की, संतप्त अभिनेत्री म्हणाली, तुमची मुलगी असती तर..?

लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू (rinku rajguru) कुठेही दिसली तरी चाहते तिच्या भोवती घोळका करतात. रिंकूची एक झलक दिसावी, तिच्यासोबत फोटो काढता यावा यासाठी चाहते कायम प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे रिंकू सुद्धा चाहत्यांसोबत छान संवाद साधते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच रिंकू तिच्या चाहत्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं. एका

कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगावमध्ये गेलेल्या रिंकूला चाहत्यांनी चांगलीच धक्काबुक्की केली. ज्यामुळे रिंकू संतापली असून तुमची मुलगी या जागी असती तर चाललं असतं का? असा संतप्त सवाल तिने विचारला.

अलिकडेच जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रिंकू राजगुरुने प्रमुख पाहुणी म्हणून हजेरी लावली होती. विशेष म्हणजे रिंकूला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी उसळली होती. परिणामी, या रिंकीला या गर्दीचा फटका बसला. कार्यक्रम संपल्यानंतर तिथून बाहेर पडताना रिंकूला चाहत्यांनी धक्काबुक्की केली. ज्यामुळे रिंकू प्रचंड संतापली.

सध्या सोशल मीडियावर रिंकूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एबीपी माझाने त्यांच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू कार्यक्रमातून बाहेर पडत असताना चाहत्यांनी तिला तिला भेटण्यासाठी तिच्या भोवती घोळका केला. परिणामी, या चाहत्यांनी केलेल्या गर्दीमध्ये रिंकूला धक्काबुक्की झाली. ज्यामुळे ती संतापली.

नेमकं काय म्हणाली रिंकू?

'या जागी जर तुमची मुलगी असती तर चाललं असतं का?' असा थेट सवाल विचारत रिंकू चाहत्यांवर भडकली. रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पहिल्यांदाच ती चिडताना दिसून आली.

दरम्यान, रिंकूने सैराट या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं आणि पाहता पाहता ती तुफान लोकप्रिय झाली. आजवरच्या कारकिर्दीत रिंकूने 'सैराट', 'मेकअप', 'आठवा रंग प्रेमाचा', 'कागर', 'झिम्मा 2' यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Web Title: rmarathi actress inku-rajguru-lashed-out-at-fans-for-misbehaviour-after-cultural-festival-in-jalgaon