iPhone चा जबरा फॅन! रितेश देशमुखने खरेदी केला नवा कोरा आयफोन १५ प्रो मॅक्स, फोटो शेअर करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 16:39 IST2023-09-22T16:38:01+5:302023-09-22T16:39:32+5:30
रितेशने आयफोन १५ प्रो मॅक्स हा नवा कोरा फोन खरेदी केला. इन्स्टाग्रामवर रितेशने त्याच्या आयफोन १५ प्रो मॅक्सची झलक दाखवली आहे.

iPhone चा जबरा फॅन! रितेश देशमुखने खरेदी केला नवा कोरा आयफोन १५ प्रो मॅक्स, फोटो शेअर करत म्हणाला...
Apple iPhone 15 भारतात आज लाँच झाला आहे. आयफोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. आयफोन १५ खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं.आयफोन 15 सीरीज अंतर्गत 4 मॉडेल लॉन्च केले गेले आहेत. पण भारतात सर्वात जास्त मागणी iPhone 15 Pro Max ला दिसून येत आहे. हा या मालिकेतील सर्वात प्रीमियम फोन आहे, ज्याची किंमत 1.59 लाख ते 1.99 लाख रुपये आहे. अनेक सेलिब्रिटींचीही आयफोनला पसंती आहे. पण मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आयफोनचा जबरा फॅन आहे.
भारतात आयफोन १५ लाँच होताच रितेश देशमुखने तो खरेदी केला आहे. रितेशने आयफोन १५ प्रो मॅक्स हा नवा कोरा फोन खरेदी केला. इन्स्टाग्रामवर रितेशने त्याच्या आयफोन १५ प्रो मॅक्सची झलक दाखवली आहे. रितेशने निळ्या रंगाचा आयफोन १५ प्रो मॅक्स खरेदी केला आहे. फोटो शेअर करत त्याने "मेरा वाला ब्लू...आयफोन १५ प्रो मॅक्स" असं म्हटलं आहे. रितेशच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
रितेश सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक घडामोडींची माहिती तो पोस्टद्वारे शेअर करताना दिसतो. रितेशने २०१२ साली अभिनेत्री जिनिलीयाबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं आहेत.