रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:11 IST2025-02-07T17:10:42+5:302025-02-07T17:11:54+5:30

रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला राजा शिवाजी सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल झालाय (riteish deshmukh)

Riteish Deshmukh photos as chhatrapati shivaji maharaj on set of Raja Shivaji movie | रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल

रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल

रितेश देशमुख (riteish deshmukh) हा बॉलिवूडपासून मराठी प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता. रितेशने आजवर त्याच्या अभिनयाने हिंदी-मराठी मनोरंजन विश्वात त्याच्या अभिनयाचा दबदबा निर्माण केलाय. रितेश देशमुख आगामी 'हाउसफुल्ल ५' आणि 'रेड २' सिनेमांमध्ये दिसणार आहे. या सिनेमांच्या शूटिंगसोबतच रितेश आगामी 'राजा शिवाजी' सिनेमाचीही तयारी करत आहे. रितेशचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'राजा शिवाजी' (raja shivaji) सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल झाले आहेत.

'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल

 'राजा शिवाजी' सिनेमाची घोषणा गेल्या काही महिन्यांपूर्वी करण्यात आली. सुरुवातीला या सिनेमाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार होते. पण आता रितेश देशमुख या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल झाले आहेत. एका न्यूज पोर्टलने हे फोटो सोशल मीडियावर हे फोटो शेअर केलेत. यात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये सेटवर वावरताना दिसतोय. याशिवाय सईबाईंच्या भूमिकेतही अभिनेत्री दिसतेय. ही अभिनेत्री कोण, याविषयी माहिती कळालेली नाही.

'राजा शिवाजी' सिनेमा कधी रिलीज होणार?

रितेश विलासराव देशमुख 'राजा शिवाजी' सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. जिनिलीया देशमुखने या सिनेमाची निर्मिती केलीय. 'राजा शिवाजी' सिनेमात मुघल सरदारांच्या भूमिकेत संजय दत्त दिसणार असल्याची शक्यता आहे. हा सिनेमा मराठी आणि हिंदी भाषेमध्ये रिलीज होणार आहे. याचवर्षी २०२५ मध्ये हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे. सध्या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. 'वेड'नंतर 'राजा शिवाजी' सिनेमाच्या निमित्ताने रितेशच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा दुसरा सिनेमा असणार आहे.

 

Web Title: Riteish Deshmukh photos as chhatrapati shivaji maharaj on set of Raja Shivaji movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.