Ved Marathi Movie : रितेश- जिनिलियाच्या 'वेड'ने १०० दिवसांत किती केली कमाई, वाचा एकूण आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 17:51 IST2023-04-09T17:49:47+5:302023-04-09T17:51:30+5:30
Ved Marathi Movie : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुखच्या 'वेड' (Ved Marathi Movie) या सिनेमाचं वेड अजूनही संपायची चिन्हं नाहीत....

Ved Marathi Movie : रितेश- जिनिलियाच्या 'वेड'ने १०० दिवसांत किती केली कमाई, वाचा एकूण आकडा
रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुखच्या 'वेड' (Ved Marathi Movie) या सिनेमाचं वेड अजूनही संपायची चिन्हं नाहीत. या सिनेमानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. सिनेमाची गाणी लोकांनी डोक्यावर घेतली आणि पाठोपाठ सिनेमाही डोक्यावर घेतला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने नुसता धुमाकूळ घातला. आज या सिनेमाला प्रदर्शित होऊन १०० दिवस झाले आहेत. या १०० दिवसांनंतरही 'वेड'ची जादू कायम आहे. या १०० दिवसांत 'वेड'ने किती कमाई केली, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असणारच. तर त्याचेही आकडे समोर आले आहेत.
'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबरला रिलीज झाला होता. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्यात. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर रिलीजनंतरच्या पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने ४० कोटी तर तिसऱ्या आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार केला. ५० दिवसांत 'वेड'ने जगभरात ७३. ५० कोटींचा गल्ला जमवला होता तर देशात ६०. ६७ कोटींचा बिझनेस केला होता. आता १०० दिवसांत या सिनेमाने एकूण किती कमाई केली तर १०० दिवसांत 'वेड'ने एकूण ७५ कोटींची कमाई केली आहे.
मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 'वेड' हा दुसरा सिनेमा ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर अर्थात अजूनही नागराज मंजुळेंंचा 'सैराट' आहे. 'सैराट'ने १३० कोटी कमावले होते. हा रेकॉर्ड मात्र 'वेड'ला मोडला आलेला नाही. पण ७५ कोटींची कमाई ही सुद्धा कमी नाही.