Ved Movie : तुम्ही अजूनही 'वेड' पाहिला नसेल तर हे वाचाच...! रितेश-जिनिलियाचं चाहत्यांना स्पेशल व्हॅलेन्टाइन गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 17:07 IST2023-02-12T17:05:48+5:302023-02-12T17:07:20+5:30
Riteish Deshmukh Genelia Deshmukh, Ved : अद्यापही 'वेड'ची क्रेझ कमी झालेली नाहीये. आता सिनेप्रेमींसाठी 'वेड' पाहण्याची आणखी एक संधी आहे. ती सुद्धा अतिशय माफक दरात.

Ved Movie : तुम्ही अजूनही 'वेड' पाहिला नसेल तर हे वाचाच...! रितेश-जिनिलियाचं चाहत्यांना स्पेशल व्हॅलेन्टाइन गिफ्ट
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ()Riteish Deshmukh Genelia Deshmukh) यांच्या 'वेड' ( Ved Movie) या सिनेमानं सर्वांनाच वेड लावलं. इतकं की, सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्यात. बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं ७० कोटींपेक्षा अधिक कमाई केली. अद्यापही 'वेड'ची क्रेझ कमी झालेली नाहीये. आता सिनेप्रेमींसाठी 'वेड' पाहण्याची आणखी एक संधी आहे. ती सुद्धा अतिशय माफक दरात.
होय, १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान अत्यंत कमी दरात 'वेड' प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महाराष्ट्रभरातील सर्वच चित्रपटगृहांत एकाच किमतीत हा सिनेमा दाखवण्यात येईल. खुद्द रितेशने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
हे आमच्याकडून चाहत्यांना 'व्हॅलेन्टाइन स्पेशल गिफ्ट' असल्याचं रितेशने म्हटलं आहे. 'वेड' बघा आणि आपला व्हॅलेन्टाईन डे खास बनवा... ९९ रूपयांत तिकिट बुक करा, असं रितेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, ही ऑफर १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान असणार आहे.
रितेशची ही पोस्ट वाचून अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ज्यांनी आत्तापर्यंत 'वेड' पाहिला नाही, त्यांच्यासाठी ही खास भेट असणार आहे.
गेल्यावर्षी ३० डिसेंबर रोजी 'वेड' सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने एकूण ७० कोटींचा आकडा पार केला. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 'वेड' हा दुसरा सिनेमा ठरल्या. पहिल्या क्रमांकावर अर्थात अजूनही नागराज मंजुळेंंचा 'सैराट' आहे.
'वेड' रीलिज झाल्यानंतर काही दिवसांनी त्याचं एक्सटेंडेड व्हर्जन प्रदर्शित करण्यात आलं होतं. या एक्सटेंडेड व्हर्जनमध्ये काही नवी सीन तसेच सत्या व श्रावणीवरचं चित्रीत एक नवं राेमॅन्टिक गाणं समाविष्ट करण्यात आलं आहे. सिनेमात रितेश-जिनिलियाचं एकही रोमँटिक गाणं नसल्याबद्दल प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या सिनेमात नव्यानं 'वेड तुझा' हे गाणं रितेश-जिनिलियावर चित्रित करण्यात आलं आहे. याआधी सिनेमामध्ये हे गाणे रितेश आणि जिया यांच्यावर चित्रित झालं होतं.