"102 ताप असताना underwater शूटिंग केलं", रिंकू राजगुरूने सांगितला 'झिम्मा २'चा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 12:13 IST2023-11-27T12:13:32+5:302023-11-27T12:13:55+5:30

"मी तलावात उडी मारली आणि...", 'झिम्मा २'साठी रिंकूने ताप असतानाही केलं शूटिंग

rinku rajguru shared experience of underwater shooting in london jhimma 2 marathi movie | "102 ताप असताना underwater शूटिंग केलं", रिंकू राजगुरूने सांगितला 'झिम्मा २'चा अनुभव

"102 ताप असताना underwater शूटिंग केलं", रिंकू राजगुरूने सांगितला 'झिम्मा २'चा अनुभव

'झिम्मा २' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या मराठी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिम्मा सिनेमाचा हा सीक्वेल आहे. 'झिम्मा २'मधून पुन्हा एकदा बायकांच्या ट्रीपची आणि त्यांच्या मजेदार रियुनियनची गोष्ट पाहायला मिळणार आहे. बायकांच्या या रियुनियनमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरूही सहभागी झाली आहे. 'झिम्मा २' मध्ये रिंकू निर्मिती सावंत यांच्या सुनेची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

'झिम्मा २'मधील रिंकूच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. ट्रेलरमध्येच 'झिम्मा २'मधील तिच्या दमदार अभिनयाची झलक दिसली होती. या सिनेमात तिने एक अंडरवॉटर सीनही केला आहे. रिंकूने 'मित्र म्हणे'ला दिलेल्या मुलाखतीत 'झिम्मा २' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला. या मुलाखतीत तिने अंडरवॉटर शूटिंगबाबतही भाष्य केलं. हा सीन शूट करताना १०२ डिग्री ताप असल्याचा खुलासाही रिंकूने केला. रिंकू म्हणाली, "या चित्रपटात माझा आणि सायलीचा एक सीन आहे. तो मला खूप आवडला. ट्रेलरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी तलावात उडी मारताना दिसत आहे." 

"तो सीन आम्हाला वन टेक हवा होता. ६ डिग्री सेल्सिअस तापमान होतं. सगळे कुडकुडत बसले होते. आणि त्यांनी मला तुला जाऊन फक्त तलावात उडी मारायची आहे, असं सांगितलं. या सीनचं मला खूप दडपण होतं. मी फक्त पळत गेले, उडी मारली आणि पोहोयला लागले. ते पाणी इतकं थंड होतं की मी सांगूही शकत नाही. पण, वन टेकमध्ये तो सीन झाला. या चित्रपटात मी पहिल्यांदाच अंडरवॉटर शूट केलं आहे. ते कसं करतात मला माहीत नव्हतं. त्यात मला १०२ डिग्री ताप होता. मला कणकण होती. पण, वेळ नसल्यामुळे कणकण असूनही मला तो सीन करावा लागला. अर्थात, आमच्या टीमने माझी पूर्णपणे काळजी घेतली. पण, आता बघताना ते छान वाटतंय. त्यामुळे कष्टाचं फळ मिळाल्यासारखं वाटतंय," असंही रिंकूने सांगितलं. 

दरम्यान, 'झिम्मा २' चित्रपटात रिंकू राजगुरू, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुहास जोशी, सायली संजीव, सुचित्रा बांदेकर, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२० कोटींचा गल्ला जमवला. या सिनेमातील गाणीही हिट झाली आहेत. 
 

Web Title: rinku rajguru shared experience of underwater shooting in london jhimma 2 marathi movie