Rinku rajguru: 'या' कारणामुळे गायब झाल्या रिंकूच्या पोस्ट; स्पष्टीकरण देत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 10:10 AM2023-09-17T10:10:17+5:302023-09-17T10:12:14+5:30

Rinku rajguru: रिंकू राजगुरुने सांगितलं अचानकपणे पोस्ट गायब होण्यामागचं कारण

rinku-rajguru-instagram-all-post-deleted-actress-shared-there-is-some-issue-now-everything-is-fine | Rinku rajguru: 'या' कारणामुळे गायब झाल्या रिंकूच्या पोस्ट; स्पष्टीकरण देत म्हणाली...

Rinku rajguru: 'या' कारणामुळे गायब झाल्या रिंकूच्या पोस्ट; स्पष्टीकरण देत म्हणाली...

googlenewsNext

लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरु (rinku rajguru) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कधी तिच्या फोटोशूटमुळे तर कधी तिच्या सिनेमांमुळे. परंतु, यावेळी ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे चर्चेत आली आहे.  अलिकडेच रिंकूच्या इन्स्टाग्रामवरील सगळ्या पोस्ट अचानक गायब झाल्या त्यामुळे रिंकूने सोशल मीडियापासून फारकत घेतली की काय? प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, या चर्चांवर रिंकूने स्पष्टीकरण दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी रिंकूच्या इन्स्टाग्रामवर सगळ्या पोस्ट अचानक गायब झाल्या होत्या. त्यामुळे तिचं अकाऊंट कोणी हॅक केलं का? तिने सोशल मीडिया सोडलं का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. परंतु, या चर्चांवर रिंकूने स्पष्टीकरण देत नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. आणि तिच्या पोस्ट कशा काय गायब झाल्या ते सांगितलं.

काय आहे रिंकूची पोस्ट?

सगळ्यांना नमस्कार, माझ्या इन्स्टाग्रामवर काही समस्या निर्माण झाली होती. पण, आता सगळं काही ठीक आह. आणि, लवकरच मी पोस्ट टाकण्यास सुरुवात करेन. तुमचं प्रेम आणि काळजीसाठी खूप धन्यवाद, असं रिंकूने म्हटलं आहे. दरम्यान, रिंकूने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे तिने स्वत:हून एकही पोस्ट डिलीट न केल्याचं स्पष्ट झालं आहे. रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ८ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
 

Web Title: rinku-rajguru-instagram-all-post-deleted-actress-shared-there-is-some-issue-now-everything-is-fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.