'देवमाणूस' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला रेणुका शहाणे पैठणी नेसून आल्या अन्...; मराठमोळ्या लूकने जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:54 IST2025-04-08T16:53:25+5:302025-04-08T16:54:05+5:30

'देवमाणूस' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला रेणुका शहाणे यांनी हजेरी लावली होती.

renuka shahane traditional look in paithani for devmanus trailer launch event | 'देवमाणूस' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला रेणुका शहाणे पैठणी नेसून आल्या अन्...; मराठमोळ्या लूकने जिंकली मनं

'देवमाणूस' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला रेणुका शहाणे पैठणी नेसून आल्या अन्...; मराठमोळ्या लूकने जिंकली मनं

महेश मांजरेकरांच्या 'देवमाणूस' सिनेमातून अभिनेत्री रेणुका शहाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमात त्या मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'देवमाणूस' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला रेणुका शहाणे यांनी हजेरी लावली होती. 'देवमाणूस'च्या ट्रेलर लॉन्चमधील त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

'देवमाणूस' च्या ट्रेलर लॉन्चला रेणुका शहाणे खास मराठमोळ्या अंदाजात दिसून आल्या. त्यांनी जांभळ्या रंगाची पैठणी नेसली होती. अगदी साध्या लूकमध्ये त्या दिसल्या. पण, त्यांच्या या मराठमोळ्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. रेणुका शहाणेंनी मीडियासमोर फोटोसाठी पोझही दिल्या. 


‘देवमाणूस’ हा सिनेमा २०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'वध' या बॉलिवूड सिनेमाच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्वांना या आगामी मराठी चित्रपटाची उत्सुकता आहे.

Web Title: renuka shahane traditional look in paithani for devmanus trailer launch event