"लोकांना मारुन काही होणार नाही...", हिंदी-मराठी वादावर स्पष्टच बोलल्या रेणुका शहाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:20 IST2025-07-17T17:20:10+5:302025-07-17T17:20:31+5:30

आधी आशुतोष राणा आणि आता रेणुका शहाणेंनीही दिली मराठी-हिंदी वादावर प्रतिक्रिया

renuka shahane reacts on hindi marathi controversy says i am agianst violence | "लोकांना मारुन काही होणार नाही...", हिंदी-मराठी वादावर स्पष्टच बोलल्या रेणुका शहाणे

"लोकांना मारुन काही होणार नाही...", हिंदी-मराठी वादावर स्पष्टच बोलल्या रेणुका शहाणे

मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री, दिग्दर्शिका रेणुका शहाणे  (Renuka Shahane) यांनी नुकतंच मराठी-हिंदी वादावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या महाराष्ट्रात हा मुद्दा फारच चर्चेत आहे. आधी सरकारचा पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय, नंतर तो जीआर मागे घेणं, मराठी न बोलणाऱ्या हिंदी भाषिकांना काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी मारणं असे अनेक प्रकार राज्यात घडले. यावरुन मारणं गरजेचं आहे का असा सूरही उमटला. अनेक सेलिब्रिटींही या वादावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता नुकतंच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही यावर मत व्यक्त केलं आहे. 

एका पॉडकास्टमध्ये रेणुका शहाणे म्हणाल्या, "जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून राहत असाल तर तिथली स्थानिक भाषा, संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. ही चांगली गोष्ट आहे. सर्वात महत्नाचं म्हणजे तुम्ही याचा आदर केला पाहिजे. त्या भाषेत बोलणं महत्वाचं नाही, तर तुम्हाला ती भाषा शिकावीशी वाटणे हा तुमचा उद्देश महत्वाचा आहे. आदर करा. ज्या लोकांना स्थानिक भाषा आणि संस्कृती  शिकून घेण्याची गरज वाटत नाही असे लोक मला पटत नाहीत.

त्या पुढे म्हणाल्या, "आणखी एक म्हणजे मी हिंसेच्या विरोधात आहे. एखाद्या अशा ठिकाणी जायचं जिथे काही लोक मराठी बोलत नाहीत आणि त्यातल्या दोन-तीन लोकांना कानाखाली मारायच्या, यातून काहीही साध्य होणार नाही."

रेणुका शहाणे यांनी हिंदी भाषित अभिनेते आशुतोष राणा यांच्याशी लग्न केलं आहे. दोन दिवसांपूर्वी आशुतोष राणा यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणालेले की, "माझ्या मुलांची मातृभाषा मराठी आहे. आणि माझ्या बायकोचीही तर तुम्ही काळजी करु नका. भाषा कधीच विवादाचा विषय नसते तर ती कायम संवादाचा विषय असते. भारत इतका पारिवारिक आणि अद्भूत देश आहे जिथे सर्व भाषा बोलल्या जातात. भारत देशाचा संवादावर विश्वास आहे." 

Web Title: renuka shahane reacts on hindi marathi controversy says i am agianst violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.