मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचं निधन, कलाकार हळहळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 08:26 IST2026-01-19T08:25:11+5:302026-01-19T08:26:46+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कला दिग्दर्शक नितीन बोरकर काळाच्या पडद्याआड

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचं निधन, कलाकार हळहळले
Nitin Borkar Passed Away: मराठी मनोरंजनविश्वातून एक दु: खद बातमी समोर आली आहे. चित्रपटसृष्टीतील नामांकित दिग्दर्शक नितीन बोरकर यांचं काल १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते ब्रेन स्ट्रोक या आजाराशी झुंज देत होते. नितीन यांच्या निधनाने संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
नितीन यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील आणि प्रतिभावंत कलाकार हरपला आहे.
नितीन बोरकर गेली अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ‘बॉईज 3’, ‘ती आणि ती’, ‘राजवाडे अँड सन्स’ तसेच 'दगडाबाईची चाळ', 'मी वसंतराव 'यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं आहे.जवळपास चाळीसपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांचं योगदान होतं. त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. पडद्यामागे राहूनही चित्रपटांना वेगळी ओळख देणाऱ्या नितीन बोरकर यांच्या सर्जनशीलतेचा ठसा कायम स्मरणात राहिल.