रवी जाधवच्या घरी छाया कदमचं जंगी स्वागत, मिठी मारत केलं भरभरुन कौतुक; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 14:22 IST2024-06-03T14:22:03+5:302024-06-03T14:22:51+5:30
'न्यूड' सिनेमातील छाया कदमची सहकलाकार कल्याणी मुळ्येही यावेळी दिसली.

रवी जाधवच्या घरी छाया कदमचं जंगी स्वागत, मिठी मारत केलं भरभरुन कौतुक; Video व्हायरल
मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हे नाव सध्या खूप गाजत आहे. एक मराठमोळी मुलगी Cannes च्या रेड कार्पेटवर जाऊन येते, तिच्या सिनेमाला तिथे स्टँडिंग ओवेशन आणि पुरस्कारही मिळतो यापेक्षा खास बात ती काय! छाया कदम यांच्या 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' सिनेमाला कान्समध्ये अवॉर्ड मिळाला. कान्सवरुन परत येताच छाया कदम यांचं जंगी स्वागत झालं. दिग्दर्शक रवी जाधवनेही (Ravi Jadhav) छाया कदम यांना घरी बोलवात त्यांचं स्वागत केलं आहे.
दिग्दर्शक रवी जाधवने छाया कदम यांना घरी बोलावलं आणि कडकडीत मिठी मारली. यावेळी अभिनेत्री कल्याणी मुळ्येही उपस्थित होती. रवी जाधवची पत्नी मेघना जाधवने छाया कदम यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं. तसंच त्यांना बरेच गिफ्ट्सही दिले. तर अभिनेत्री कल्याणी मुळ्येने छाया यांच्यासाठी चार शब्द वाचून दाखवले आणि त्यांना सॅल्युट केलं. रवी जाधवला बघून छाया कदम खूश झाल्या आणि दोघांनी अगदी कडकडीत मिठी मारत आनंद साजरा केला. नंतर सर्वांनी मस्त फोटोशूटही केलं, डान्स केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रवी जाधवच्या 'न्यूड' या मराठी सिनेमात छाया कदम आणि कल्याणी मुळ्ये दोघींनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यात दोघींनी न्यूड सीन्स दिल्याने सिनेमा चांगलाच चर्चेत होता. त्यांचं खूप कौतुकही झालं होतं. सिनेमाला अनेक पुरस्कारही मिळाले. यानंतर छाया कदम यांनी मिळवलेलं हे यश पाहून रवी जाधवही भारावला.