"छत्रपती शिवरायांना मिठी मारण्याचा आनंद तुमच्या रुपाने मिळाला...", 'राजा शिवाजी'मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची रितेशसाठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:57 IST2026-05-08T11:56:27+5:302026-05-08T11:57:46+5:30

'राजा शिवाजी'मध्ये अभिनेता अशोक समर्थ यांनी कान्होजी जेधे हे पात्र साकारलं आहे. सोशल मीडियावर या सिनेमातील पात्राचा फोटो शेअर करत त्यांनी रितेश देशमुखसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

raja shivaji movie actor ashok samarth shared post for ritesh deshmukh | "छत्रपती शिवरायांना मिठी मारण्याचा आनंद तुमच्या रुपाने मिळाला...", 'राजा शिवाजी'मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची रितेशसाठी पोस्ट

"छत्रपती शिवरायांना मिठी मारण्याचा आनंद तुमच्या रुपाने मिळाला...", 'राजा शिवाजी'मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची रितेशसाठी पोस्ट

Raja Shivaji: रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सिनेमा जगभरात गाजत आहे. या सिनेमात बरेच कलाकार झळकले आहेत. बॉलिवूड कलाकारांसह काही मराठी कलाकारांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. 'राजा शिवाजी'मध्ये अभिनेता अशोक समर्थ यांनी कान्होजी जेधे हे पात्र साकारलं आहे. सोशल मीडियावर या सिनेमातील पात्राचा फोटो शेअर करत त्यांनी रितेश देशमुखसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 

'राजा शिवाजी'साठी अशोक समर्थ यांची पोस्ट

"एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं आणि ते सत्य सृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं. त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावलांनी त्या स्वप्नांच्या मागे धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो तो या मुळेच ! 

वि.स. खांडेकरांचं हे वाक्य लागू होतं ते या चित्रपटाची संपूर्ण धुरा सांभाळलेल्या रितेशजी देशमुख यांना आणि सहचारिणी जिनिलिया देशमुख यांना...

खरोखर झपाटलेपणाने रितेशजींनी या स्वप्नाचा पिच्छा पुरवला आणि त्याला आपल्या कवेत सामावून घेतलं. त्याला कुरवाळलं, त्याला जोपासलं आणि आज आपल्यासमोर आणलं. सरजी तुमचं मनापासून अभिनंदन आणि अभिवादन...

अत्यंत महत्वाचं पात्र म्हणून कान्होजी जेधे साकारण्याची जबाबदारी आपण माझ्यावर सोपवली आणि आज देशाच्या कानाकोपऱ्यातून चित्रपटाच्यासोबत प्रेक्षकांनी मला पण स्वीकारल्याची पोचपावती रसिक मला देत आहेत. याचा खरंच विलक्षण हर्ष होतोय मला...

छत्रपतींसारख्या महापुरुषाला मिठी मारण्याचा आनंद मला तुमच्या रूपाने मिळाला... खरंतर हे वाक्य वाचायला ऐकायला इतरांना वेगळं वाटेल. पण ही भावना माझी आहे. रितेशजी मनापासून तुमचे आभार आणि धन्यवाद 

दरम्यान, 'राजा शिवाजी' सिनेमात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही त्याने केलं आहे. 'राजा शिवाजी'ने अवघ्या ७ दिवसांतच ५० कोटींचा टप्पा गाठला आहे. हा सिनेमा आणखी किती कमाई करेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

Web Title : 'राजा शिवाजी' में भूमिका के लिए अभिनेता ने रितेश देशमुख की प्रशंसा की।

Web Summary : 'राजा शिवाजी' में कान्होजी जेधे की भूमिका निभाने वाले अशोक समर्थ ने रितेश देशमुख द्वारा शिवाजी महाराज के चित्रण की प्रशंसा की। उन्होंने अवसर के लिए आभार व्यक्त किया और देशमुख द्वारा निर्देशित फिल्म की सफलता को स्वीकार किया, जिसने सात दिनों में ₹50 करोड़ कमाए।

Web Title : Actor praises Riteish Deshmukh for 'Raja Shivaji' role.

Web Summary : Ashok Samarth, who played Kanhoji Jedhe in 'Raja Shivaji,' praised Riteish Deshmukh's portrayal of Shivaji Maharaj. He expressed gratitude for the opportunity and acknowledged the film's success, directed by Deshmukh, which has earned ₹50 crore in seven days.